उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?, अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

On: August 25, 2024 2:21 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Govt) सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र काही महिलांनी पैसे मिळाले नाहीत.

31 जुलै पर्यंतच्या ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. या महिलांना लवकरच लाभ मिळणार आहे, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?

मंत्री तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. ही प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच 31 जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मंत्री तटकरे यांनी केलं आहे.

पैसे जमा न झाल्यास कुठे कराल तक्रार?

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. काही महिलांचे अर्ज मंजूर होताना अडचणी येत आहेत. अशा अडचणी येत असतील तर महिलांनी कुठे तक्रार करावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्तीदूत अॅपवर त्याबाबत तक्रार करू शकतात.

यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकारदरबारी मांडू शकतात. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

मोठी दुर्घटना! पुण्यात ‘या’ ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश

सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर घातली बंदी; पाहा औषधांची यादी

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार का? वाचा सविस्तर

महाराष्ट्र हादरला! पुन्हा एका मुलीवर बलात्कार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now