पैसा घरात टिकवून ठेवण्यासाठी आजच करा ‘हा’ सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय!

On: November 10, 2025 6:33 PM
Vastu Tips for Money
---Advertisement---

Vastu Tips for Money | महागाईमुळे प्रत्येक जण आर्थिक ताणाखाली आहे. मिळणाऱ्या पगाराचा ताळमेळ खर्चाशी बसवताना निम्मा पगार दहाव्या तारखेपर्यंत संपतो. कितीही मेहनत केली तरी हातात पैसा टिकत नाही. अशी स्थिती असल्यास चिंता करण्याची गरज नाही. वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत, ज्यामुळे घरात बरकत राहते, खर्च कमी होतो आणि धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. (Money Saving Remedies)

महिन्याच्या पहिल्या दिवशी करा हा सोपा उपाय :

जर तुमचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल, तर महिन्याच्या पहिल्या तारखेला लक्ष्मीमातेची पूजा करून एक रुपया अर्पण करा. त्यानंतर तो रुपया घरातील पिठाच्या डब्यात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार या उपायामुळे घरात पैसा टिकतो, अनावश्यक खर्च कमी होतात आणि कर्जातून सुटका होते. (Money Saving Remedies)

अचानक मिळालेला पैसा पटकन खर्च होतो का? तर तुमच्या पाकिटात सात लवंगा ठेवा. वास्तुशास्त्रानुसार लवंग शनि आणि मंगळ ग्रह शांत करतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे धनसंचयाची क्षमता वाढते. मात्र, या लवंगा दर महिन्याला बदलणे आवश्यक आहे. (Vastu Tips for Money)

जर तुम्हाला अचानक धनलाभ व्हावा अशी इच्छा असेल, तर दर शुक्रवारी दुर्गा मातेची पूजा करा. वास्तुशास्त्र सांगते की, या पूजेमुळे देवीचा आशीर्वाद मिळतो आणि अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात.

Vastu Tips for Money | अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी करा हे :

जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील आणि ते परत मिळत नसतील, तर दररोज सूर्यदेवाला अर्ध्य द्या. सूर्यपूजेमुळे आर्थिक अडचणी कमी होतात. तसेच घराच्या उत्तर दिशेला कुबेराची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास धनलाभ होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

News Title: If money slips out of your hands no matter how much you earn, try this simple Vastu remedy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now