ICC New Rule | कसोटी क्रिकेटचा थरार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे अधिक रंगतदार झाला असतानाच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 2027-29 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये काही देशांसाठी कसोटी सामने पाच नव्हे, तर चार दिवसांचे असतील, असा मोठा बदल केला जाणार आहे. (ICC Ready for 4 Day Test Cricket)
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसाठी पाच दिवस कायम :
ICC अध्यक्ष जय शाह यांनी नुकत्याच पार पडलेल्या लॉर्ड्सवरील WTC फायनलमध्ये झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मात्र, यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन प्रमुख क्रिकेट देशांना पारंपरिक पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांची परवानगी देण्यात आली आहे. (ICC New Rule)
यामध्ये ऍशेस, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी यांसारख्या प्रतिष्ठित मालिका पाच दिवसांच्या स्वरूपातच होतील.
ICC New Rule | लहान देशांसाठी नवा मार्ग – खर्च आणि वेळेची बचत :
कसोटी क्रिकेटचे आयोजन आणि ब्रॉडकास्टिंग खर्च यामुळे अनेक लहान क्रिकेट बोर्ड पाच दिवसांच्या मालिकांना नकार देत आहेत. त्यामुळे चार दिवसांत एक कसोटी सामना खेळवण्याची संकल्पना पुढे आणली गेली आहे. (ICC New Rule)
या निर्णयामुळे तीन कसोटी सामने तीन आठवड्यांत पूर्ण होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे वेळ आणि संसाधनांची बचत होईल, आणि खेळ अधिक व्यावसायिक आणि आकर्षक बनेल, असा ICC चा विश्वास आहे.
एका दिवसात 98 षटकांचा नवा नियम :
पाच दिवसांच्या कसोटीत सध्या दिवसाला 90 षटके खेळवली जातात. पण चार दिवसांच्या सामन्यांत दिवसाला 98 षटके खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामुळे लवकर निकाल लागण्याची शक्यता वाढेल आणि खेळ अधिक गतिमान होईल. (ICC Ready for 4 Day Test Cricket)
दरम्यान, भारत हा ICC च्या दृष्टीने सर्वात मोठा आर्थिक केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर क्रिकेटमधील प्रेक्षकसंख्या, ब्रॉडकास्टिंग डील्स, आणि स्पॉन्सरशिप यामुळे भारतीय क्रिकेटला वेगळं स्थान मिळतं. म्हणूनच भारताला, इंग्लंडला आणि ऑस्ट्रेलियाला पारंपरिक कसोटी क्रिकेटचे रक्षण करणारे देश मानले जात असून, त्यांच्यासाठी नियम शिथिल ठेवले गेले आहेत.






