गावातून पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!

On: December 1, 2024 5:01 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | राज्यातील राजकारण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या मुळगावी दरेगावला गेल्यानं चर्चेला उधाणा आलं होतं, अखेर याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

…म्हणून मी दरे गावाला आलो- एकनाथ शिंदे

सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. मी नेहमी गावी येत असतो. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.

मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले. निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्बेत बिघडली होती. रोज आठ, दहा सभा मी घेत होतो. परंतु आता माझी प्रकृती आता बरी आहे, असं शिंदे (Eknath Shinde) म्हणालेत.

“मी कॉमन मॅन म्हणून काम केलं”

मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेतील. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी काम केलं, असंही शिंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!

अजितदादांच टेन्शन वाढणार? युगेंद्र पवारांनी उचललं मोठं पाऊल

‘निवडणुकीसाठीच योजना…’; लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवारांची जाहीर कबुली

महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now