ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची संधी! फिजिक्सवालाचा IPO ‘या’ तारखेला येणार

On: November 7, 2025 5:14 PM
PhysicsWallah IPO
---Advertisement---

PhysicsWallah IPO | शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या फिजिक्सवाला (PhysicsWallah) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आयपीओ अखेर उघडणार आहे. अनेक गुंतवणूकदारांनी ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. कंपनीने जाहीर केल्यानुसार 11 नोव्हेंबर 2025 रोजी हा आयपीओ बाजारात येणार आहे. यामध्ये गुंतवणूक करून सामान्य गुंतवणूकदारांनाही मालामाल होण्याची संधी मिळणार आहे.
कंपनीने रजिस्टर ऑफ कंपनीजकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केले असून, संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी अँकर बुकिंग 10 नोव्हेंबरला खुले राहणार आहे. तर सार्वजनिक इश्यू 13 नोव्हेंबरपर्यंत खुला असेल. या आयपीओचे एकूण मूल्य ₹3480 कोटी रुपये इतके असणार आहे.

फिजिक्सवालाचे शेअर्स कधी आणि कुठे ट्रेड होणार? :

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, शेअर वाटप प्रक्रिया 14 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल आणि 18 नोव्हेंबरपासून BSE व NSE वर शेअर ट्रेडिंग सुरू होईल. या आयपीओद्वारे कंपनी ₹3100 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. तेच फिजिक्सवालाचे प्रमोटर्स अलख पांडे आणि प्रतिक बूब हे ऑफर-फॉर-सेलद्वारे ₹380 कोटींचे शेअर्स विकणार आहेत.

सध्या ही कंपनी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, अपस्किलिंग कोर्सेस आणि ऑफलाइन क्लासेससुद्धा चालवते. काही वर्षांतच या ब्रँडने देशभरात लोकप्रियता मिळवली आहे.

PhysicsWallah IPO | कोणाचा किती वाटा आणि पैशांचा वापर कसा होणार? :

सध्या फिजिक्सवालामध्ये दोन्ही प्रमोटर्सचा 80.62% इतका वाटा आहे, तर सार्वजनिक शेअरधारकांकडे 19.38% शेअर्स आहेत. यात वेस्टब्रिज AIF (6.40%), हॉर्नबिल कॅपिटल (4.41%), GSV व्हेंचर्स (2.85%) आणि लाइट्सपीड अपॉर्च्युनिटी फंड (1.79%) यांचा समावेश आहे.

आयपीओद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर कंपनी विविध विकासात्मक कामांसाठी करणार आहे. उत्कर्ष क्लासेस अँड एडुटेकच्या ऑफलाइन सेंटरसाठी ₹28 कोटी भाडे आणि ₹26.5 कोटी शेअरहिस्सेदारीसाठी वापरले जाणार आहेत. तसेच सर्व्हर व क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठीही गुंतवणूक होईल.

कंपनीचे आर्थिक चित्र आणि भविष्याचा अंदाज :

फिजिक्सवाला ही भारतातील टॉप 5 एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक मानली जाते. 2020 मध्ये अलख पांडे आणि प्रतीक बूब यांनी याची स्थापना केली होती. फक्त पाच वर्षांत या कंपनीने शिक्षणक्षेत्रात एक साम्राज्य उभारले.

तथापि, जून 2025 च्या तिमाहीत कंपनीला ₹152 कोटींचे नुकसान झाले आहे. पण महसूलात सकारात्मक वाढ दिसते – आर्थिक वर्षात 33.3% वाढ होऊन महसूल ₹847 कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी ₹635.2 कोटी होता.

News Title: PhysicsWallah IPO Opening on November 11: Everything About Price, Date, and Investor Opportunities

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now