Malhar Koli Demand | मराठा समाजासाठी सरकारने हैदराबाद गॅझिटिअर लागू करून नवीन जीआर काढल्यानंतर आता मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजानेही अशीच मागणी पुढे केली आहे. समाज बांधवांचा आरोप आहे की, त्यांच्या मागण्यांकडे गेल्या अनेक दशकांपासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासनाने तातडीने तोडगा न काढल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
75 वर्षांचा न्यायहक्काचा लढा :
या समाजातील नागरिकांचा 75 वर्षांपासून जात प्रमाणपत्रासाठी संघर्ष सुरू आहे. शासनाकडून अनेकदा आश्वासने मिळाली, मात्र ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे असंतोष तीव्र झाला असून, हैदराबाद गॅझिटिअर लागू करण्याच्या जीआरमध्ये आमचाही समावेश करावा, अशी मागणी समाजातून होत आहे.
Malhar Koli Demand | प्रमुख मागण्या कोणत्या? :
जात प्रमाणपत्र तातडीने द्यावे – महादेव कोळी, आदिवासी कोळी, मल्हार कोळी समाजातील नागरिकांना त्वरित जात प्रमाणपत्र मिळावे. (Hyderabad Gazetteer)
रक्त नात्यातील व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र – अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र परिपत्रक काढावे.
1950 पूर्वीच्या नोंदींचा आधार – कोळी समाजाच्या 1950 पूर्वीच्या नोंदींवर आधारित प्रमाणपत्र निर्गमित करावे.
विविध दस्तऐवजांचा आधार – टीसी, वडिलांचे जात प्रमाणपत्र, 36अ नोंदी, निर्गम उतारा यांच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे.
ओबीसी महासंघाची भूमिका :
दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी काँग्रेस नेत्यांना खुले आव्हान दिले आहे. राज्य सरकारने आमच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य केल्या असून, शासन आदेशासाठी उद्या बैठक बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन जीआरमुळे ओबीसींचे नुकसान झालेले नाही, या भूमिकेवर ते ठाम असल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले. (Malhar Koli Demand)
“मनोज जरांगे सोडले तर कोणताही मराठा अभ्यासक असे म्हणत नाही की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल,” असेही ते म्हणाले.






