Hyderabad Gazette Approved | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटला अखेर सरकारकडून अंमलबजावणीची परवानगी देण्यात आली असून राज्यपालांची सही होताच तातडीने शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार आहे. ही माहिती स्वता: मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे.
विखे पाटील भेटीला दाखल, आंदोलनाचा तोडगा?
आज दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे आझाद मैदानावर जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झाले. (Hyderabad Gazette Approved)
या भेटीनंतरच हैदराबाद गॅझेट अंमलात आणण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
Hyderabad Gazette Approved | पुढील पावलं काय? :
राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यपालांची अंतिम सही होताच शासन निर्णय काढून अंमलबजावणी केली जाणार आहे. जरांगे पाटलांनीही या निर्णयाचे स्वागत करत, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मराठा समाजाशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत.






