Smoking | सिगरेट ओढणाऱ्या लोकांना अनेकदा धूम्रपान करू नये (Smoking) असा सल्ला दिला जातो. धूम्रपान करणं जरी चुकीचं असलं तरी ही सवय लवकर सुटत नाही. पण धूम्रपान करणं स्वत:साठी घातक आहेत पण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी देखील ते जिवघेणं ठरू शकतं.
नवऱ्यामुळे बायकोला होऊ शकतो Cancer?
ओन्कोलॉजिस्ट डॉ. ब्रह्मजीत सिंह यांनी सांगितलं की, 24 वर्षीय महिला रुग्णाला फुप्फुसांचा कर्करोग झाला होता. तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली. त्या महिलेच्या नवऱ्याला धूम्रपानाचं भयंकर व्यसन आहे. त्याच धुराचा परिणाम तिच्या फुप्फुसांवर झाला.
धूम्रपानातून येणारा धूर म्हणजे हवा प्रदूषण, जे आपल्या फुप्फुसांसाठी किती घातक ठरू शकतं हे यातून दिसून आलं. म्हणूनच प्रत्येकानं स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त भक्कम करणं हाच यावर उपाय आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
देशात हवा प्रदूषण प्रचंड वाढतंय. त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतोय. म्हणून प्रत्येकानं दररोज व्यायाम करायलाच हवा. निरोगी आहार आणि सकारात्मक विचार, ही सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.
Smoking | पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय?
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, धूम्रपानामुळे दररोज सुमारे 14 हजार लोक आपला जीव गमावतात. सिगारेट ओढणारेच नाहीतर, तर सिगारेट ओढणाऱ्यांच्या आजूबाजूला उभे राहणाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. हे खूप हानिकारक आहे आणि हळूहळू सिगारेटचा धूर तुमचं आरोग्य नष्ट करू शकतो.
सिगारेट, बिडी किंवा सिगारमधून निघणारा धूर हा विषारी असतो. एकप्रकारे याला धुराचे अवशेष असेही म्हणता येईल. हे तुमचे केस, त्वचा, कपडे, सामान, खोली, कार, कार्पेट आणि अगदी लहान मुलांच्या खेळण्यांना चिकटून राहतं.
महत्त्वाच्या बातम्या-
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं जिंकलं भारतीयांचं मन; PM मोदी खास पोस्ट करत म्हणाले..
“मृत्यू नंतर माझं..”; मनोज जरांगे यांची वाढदिवशी मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक
मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, मलेरियासह ‘या’ आजारांचा धोका वाढला






