Kunbi Certificate Apply Online | मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी उभारलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं. त्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार निर्णय घेत मराठा समाजातील ज्या नागरिकांच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्यांना कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. आता हे प्रमाणपत्र कसं काढायचं आणि किती दिवसांत मिळणार, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणारा कालावधी :
राज्य शासनाच्या नियमानुसार, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान 21 दिवस ते जास्तीत जास्त 45 दिवस इतका कालावधी लागतो. अर्ज केल्यानंतर विविध स्तरांवर तपासणीची प्रक्रिया होणार असल्याने हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. (Kunbi Certificate Apply Online)
आवश्यक कागदपत्रं :
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्रं सादर करावी लागतात :
पूर्वजांचा महसुली नोंदीतील जातीचा पुरावा
तो उपलब्ध नसल्यास रक्तनात्याच्या नातलगाचा जातीचा पुरावा
वंशावळ जुळवणारं शपथपत्र
शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीवर आधारित पुरावा
जातपुराव्यासह शाळा सोडल्याचा दाखला (TC) आणि इतर आवश्यक कागदपत्रं
Kunbi Certificate Apply Online | अर्ज प्रक्रिया :
सर्व कागदपत्रांसह महाऑनलाईन पोर्टल (MahaOnline) वर अर्ज करावा.
हा अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात पोहोचेल. (Kunbi Certificate Apply Online)
तहसिलदार कार्यालय छाननी करून जर त्रुटी आढळल्या तर त्या अर्जदाराला कळवल्या जातील.
त्रुटी नसल्यास अर्ज ग्रामस्तरीय समितीकडे अभिप्रायासाठी पाठवला जाईल.
ग्रामसमितीचा अहवाल मिळाल्यावर अर्ज उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे जाईल.
अंतिम प्रमाणपत्र कोण देतो? :
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer) यांच्या स्वाक्षरीने अधिकृत कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे.






