Raisins in Summer l उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात थोडा बदल आवश्यक असतो. शरीर हायड्रेट राहावं, उष्णता कमी व्हावी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहावी यासाठी सुकामेवा, विशेषतः मनुके खूप उपयुक्त ठरतात. पण मनुके खाण्याची पद्धत योग्य नसेल, तर ते आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात मनुके कसे खावेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
कच्चे मनुके नको, भिजवलेले मनुके खा :
मनुके हे उष्ण प्रकृतीचे असतात. म्हणून उन्हाळ्यात कच्चे मनुके खाल्ल्यास शरीराचे तापमान वाढू शकते, पोटात उष्णता निर्माण होऊ शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी १० मनुके स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवावेत, आणि सकाळी उठल्यावर ते खाणं आणि त्याचं पाणी पिणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
Raisins in Summer l मनुक्यांमधील आरोग्यदायी घटक :
लोह (Iron): हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त
फायबर (Fiber): पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते
पोटॅशियम: हृदयाचे आरोग्य सुधारते
अँटीऑक्सिडंट्स: रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
Raisins in Summer l कधी आणि किती खावं? :
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात दररोज १० भिजवलेले मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाणं उत्तम. हे केवळ हायड्रेशनसाठीच नव्हे तर त्वचेचं आरोग्य, डायजेस्टिव्ह सिस्टिम आणि एनर्जी लेव्हल्ससाठीही फायदेशीर ठरतं. पण त्यापेक्षा जास्त खाल्ल्यास ते उलट शरीरात उष्णता वाढवू शकतात.
मनुक्यांचं पाणी म्हणजे एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक. हे लिव्हर साफ करण्यात मदत करतं, पचन सुधारतं आणि त्वचेचा नूर वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी न घेता, सकाळी भिजवलेल्या मनुक्यांचं पाणी प्यायल्यास शरीराला भरपूर फायदे होतात.






