Tractor Loan | दिवाळी हा नवा ट्रॅक्टर घेण्यासाठी शुभ काळ मानला जातो. अनेक शेतकरी या काळात ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतात, पण मोठा अडथळा असतो तो म्हणजे कर्जफेडीचा ताण. बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी EMI ठरवताना काळजी घ्यावी लागते. चुकीची गणना केल्यास पुढील काही वर्षे आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वाढते. (Tractor Loan)
तज्ञांच्या मते, ट्रॅक्टरचा मासिक हप्ता (EMI) हा शेतकऱ्याच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या २० ते २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. म्हणजेच, जर शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असेल (म्हणजे महिन्याला २५ हजार), तर ट्रॅक्टरचा हप्ता ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत ठेवणे योग्य ठरेल. त्यामुळे इतर शेतीखर्च—बियाणे, खते, मजूर व वीज बिल—यावर परिणाम होत नाही. (Tractor Loan EMI)
किती लोन घ्यावे आणि EMI किती ठेवावा? :
जर शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये (मासिक ५०,०००) असेल, तर हप्ता मासिक उत्पन्नाच्या २५% पेक्षा जास्त ठेवू नये. अशा परिस्थितीत, दरमहा सुमारे १२,५०० रुपयांच्या हप्त्याने ७.५ लाखांचे कर्ज पाच वर्षांत सहज फेडता येते.
लोन घेण्याआधी आपले उत्पन्न, खर्च आणि बचत यांचा स्पष्ट अंदाज घ्यावा. EMI जास्त ठेवल्यास शेतीतील इतर खर्च भागवणे कठीण जाते.
Tractor Loan | ट्रॅक्टर लोन घेताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी :
ट्रॅक्टर घेताना १५ ते २० टक्के डाउन पेमेंट देणे फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, ९ लाख किंमतीच्या ट्रॅक्टरसाठी १.५ ते १.८ लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास हप्ता कमी होतो आणि व्याजाचा भार कमी पडतो.
तसेच सरकारी बँका शेतकऱ्यांना ८% ते १०% व्याजदराने कर्ज देतात, तर खासगी वित्तसंस्था १२% ते १५% व्याज आकारतात. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणे जास्त सुरक्षित ठरते. (Tractor Loan EMI)
मुदत, विमा आणि देखभाल महत्त्वाची :
कर्जाची मुदत ५ वर्षांपेक्षा जास्त ठेवू नका, कारण मुदत वाढल्यास एकूण व्याज रक्कम मोठी होते. ट्रॅक्टरसाठी दरवर्षी १०,००० ते १५,000 रुपये विमा आणि देखभालीसाठी राखून ठेवणे अत्यावश्यक आहे. यामुळे आकस्मिक अपघात किंवा दुरुस्तीचा खर्च सहज भागवता येतो.
EMI = मासिक उत्पन्नाच्या २५% पेक्षा जास्त नाही
डाउन पेमेंट = ट्रॅक्टर किंमतीचा १५-२०%
व्याजदर = ८-१०% (सरकारी बँक)
मुदत = ५ वर्षांपर्यंत (Tractor Loan EMI)
थोडक्यात सांगायचं झालं, तर ट्रॅक्टर लोन घेण्याआधी नियोजनपूर्वक EMI ठरवा आणि सरकारी बँकांचा पर्याय निवडा. योग्य नियोजनाने ट्रॅक्टर खरेदीसह शेतीचा विस्तार करणे अधिक सोपे आणि ताणमुक्त ठरते.






