हॉटस्टारवर आता क्रिकेट सामन्यांचं समालोचन मराठीतून; मनसेच्या आंदोलनाला यश

On: January 28, 2025 3:52 PM
Disney Hotstar
---Advertisement---

Disney Hotstar l मुंबईतील (Mumbai) ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) असलेल्या डिज्ने हॉटस्टारला (Disney Hotstar) मनसेने (MNS) दणका दिला आहे. हॉटस्टारवर दाखवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे (Cricket Matches) समालोचन (Commentary) मराठीतून (Marathi) करण्यास टाळाटाळ करणाऱ्या हॉटस्टारला, मनसेच्या आंदोलनानंतर नमते घ्यावे लागले आहे. यापुढे क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठीतून करू, असे लेखी आश्वासन हॉटस्टारने दिले आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) आणि विभागप्रमुख संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी मनसैनिकांसह सोमवारी वरळी (Worli) येथील हॉटस्टारच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. “सामन्यांचे समालोचन मराठीतून करू, असे लेखी आश्वासन मिळेपर्यंत येथून जाणार नाही,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती.

हॉटस्टारवर मराठीचा पर्याय का नाही? :

25 जानेवारीला भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात झालेला दुसरा टी-20 सामना (T-20 Match) हॉटस्टारवर हिंदीसह (Hindi) अन्य सात भाषांमध्ये समालोचनासह दाखवण्यात आला. मात्र, त्यात मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नव्हता.

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा असूनही, तिचा पर्याय का देत नाहीत?” असा संतप्त सवाल अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना केला.

Disney Hotstar l मनसेच्या आंदोलनापुढे हॉटस्टार नरमले :

मनसेच्या आक्रमक पवित्र्यापुढे हॉटस्टार प्रशासनाला नमतं घ्यावे लागले. अखेर, यापुढे क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठीतून दाखवले जाईल, असे लेखी आश्वासन हॉटस्टारने दिले. “महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी भाषेसाठी भांडावे लागत असेल, तर ते दुर्दैव आहे,” अशी प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिली. तसेच, “मराठी लोकांनी समालोचन ऐकण्यासाठी मराठी भाषेचा वापर करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, या आंदोलनानंतर अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक (Ketan Naik) आणि अन्य मनसे पदाधिकारी (MNS Office Bearers), कार्यकर्त्यांविरोधात (Activists) ना. म. जोशी मार्ग (N. M. Joshi Marg) पोलिसांनी गुन्हा (FIR) नोंदवला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची नासधूस केल्याची तक्रार हॉटस्टारने केली आहे.

News Title : Hotstar-To-Show-Cricket-Commentary-In-Marathi-After-MNS-Protest

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now