चहा, कॉफी पिणं टाळा! गरम पेयांमुळे होतोय कॅन्सर, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

On: August 21, 2025 3:59 PM
Hot drinks cancer risk
---Advertisement---

Hot drinks cancer risk | आपल्यातील अनेकांना गरमागरम चहा, कॉफी किंवा दूध पिण्याची आवड असते. वाफाळतं पेय हातात येताच थेट घशात ओतणाऱ्या लोकांना त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय अभ्यास सांगतो की अतिगरम पेयांचं सेवन अन्ननलिकेच्या कॅन्सरला थेट कारणीभूत ठरू शकतं. साधारणपणे बाजारात मिळणाऱ्या हॉट ड्रिंक्सचे तापमान ८५–९०°C असतं. इतक्या उष्णतेमुळे घसा आणि अन्ननलिकेतील पेशींना वारंवार इजा होते आणि कॅन्सरचा धोका निर्माण होतो. (Hot drinks cancer risk)

गरम पेय आणि कॅन्सरचा थेट संबंध :

२०१६ मध्ये International Agency for Research on Cancer (IARC) ने ६५°C पेक्षा जास्त तापमानावर घेतलेल्या पेयांना “probably carcinogenic” म्हणजेच “कॅन्सरचं संभाव्य कारण” म्हणून घोषित केलं होतं. दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेतल्या अभ्यासांमध्येही हे स्पष्ट झालं की ज्या लोकांनी ७०°C पेक्षा गरम पेय घेतलं, त्यांच्यात अन्ननलिकेचा कॅन्सर अधिक प्रमाणात आढळला.

यूकेमध्ये तब्बल ५ लाख लोकांवर झालेल्या भव्य संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आले. दररोज ८ कपांपेक्षा जास्त गरम चहा किंवा कॉफी घेणाऱ्यांना अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका इतरांच्या तुलनेत ६ पट अधिक असल्याचं आढळलं. आधी पाश्चिमात्य देशांमध्ये असा ठोस पुरावा नसल्याने हे निष्कर्ष अधिक महत्त्वाचे ठरले.

Hot drinks cancer risk | अतिगरम पेय शरीराला कसं हानीकारक? :

खूप गरम पेय गिळल्यावर अन्ननलिकेचं आतील लेयर भाजल्यासारखं होतं. सतत असं नुकसान झाल्यावर त्या जागी जखमा तयार होतात. या जखमांमधून पेशींमध्ये असामान्य बदल होऊन ते कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात. प्राण्यांवरील प्रयोगांमध्येही गरम पाणी पाजलेल्या उंदरांमध्ये कॅन्सरच्या गाठी जलद गतीने वाढल्याचं दिसलं आहे. (Hot drinks cancer risk)

सुरक्षिततेसाठी सोप्या टिप्स :

तज्ज्ञ सांगतात की चहा किंवा कॉफी हा धोक्याचा भाग नाही, तर त्याचं तापमान धोकादायक आहे. पेय ५७–५८°C वर घेतल्यास ना पेशींना हानी होते, ना चव बिघडते.

पेय उकळताच न पिता ३–५ मिनिटं थांबावं.

दिवसाला ३–४ कपांपेक्षा जास्त सेवन टाळावं.

थोडं थंड दूध किंवा पाणी मिसळून पेय सुरक्षित करावं.

झाकण उघडं ठेवून, फुंकर घालून मगच प्यावं.

म्हणजेच, गरमागरम पेय पिण्याची सवय जरी आनंददायी वाटत असली तरी दीर्घकाळासाठी ती जीवघेणी ठरू शकते. थोडं संयम बाळगून पेय थंड झाल्यावरच सेवन करणं हीच सर्वोत्तम काळजी आहे.

News Title: Drinking Hot Tea, Coffee or Water Can Cause Cancer? Research Reveals Shocking Truth

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now