आज ‘या’ राशींना होणार तिप्पट लाभ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

On: October 17, 2025 1:15 PM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope । आज 17 ऑक्टोबर शुक्रवार, कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. आज विष्णू आणि लक्ष्मीचा दिवस पाहायला मिळणार आहे, त्यामुळे काही राशीच्या लोकांना तिप्पट लाभ होऊ शकतो. काय आहे आजचे राशीभविष्य? जाणुन घेऊया.

मेष – आजचा दिवस धावपळीचा असेल. व्यवसायात तुम्ही योजना आखाल ज्यामुळे तुम्हाला भाविष्यात फायदा होईल. आज विचारपूर्वक काम करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि फायदाही होईल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाच्या ठिकाणी लोकांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. व्यवसायासाठी आजचा दिवस आनंदी राहील. आनंदीदायी वातावरण राहील. आज शिवाराधना करणे चांगले फळ देऊ शकते.

वृषभ – आजचा दिवस प्रगतीचा असेल. समाजात आज तुमची प्रतिष्ठा वाढेल. पैश्यांसाठी केलेले काम आज फायदा देऊ शकते. व्यवसायिकानां आज नफा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज व्यवसायाच्या ठिकाणी नवीन सहकारी भेटतील. आणि ते तुम्हाला यश मिळवून देण्यास मदत करतील. राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांना देखील आज फायदा होऊ शकतो. आज आपल्या जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर राहील.

मिथुन – आज व्यवसायच्या कामामुळे धावपळ होईल, पण त्यामुळे व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. आज तुमच्या मुलांच्या कृतिमुळे तुम्ही आनंदित व्हाल. कोर्टात एखादी केस चालू असल्यास आज हे प्रकरण पूर्ण होऊ शकते. आज कुटुंबियांशी तुमचे नाते घट्ट होईल. आज आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही आज संध्याकाळी आपल्या जीवनसाठीसोबत फिरायला जाऊ शकता. आज कार्यात विशेष लक्ष देणे गरजेचे.

कर्क – आज कामामुळे धावपळ करावी लगू शकते. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आज आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आज कौटुंबिक समस्यांवर चर्चा होईल आणि आई वडिलांचा सल्ला लाभेल आणि ताण कमी होईल. मुलांच्या भविष्याविषयी काळजी वाटेल. पण त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि समजूतदारीने गोष्टी हाताळा. आज तुमचा खर्च वाढू शकतो.

सिंह – घरात आज वातावरण सुखाचे असेल. सुख समृद्धी घरात असेल. मुलांसोबतही आज दिवस छान जाईल. एखादा पाहुणा येण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या ठिकाणी आज तुम्हाला सहकार्यांची मदत लागेल. प्रामाणिकपणे केलेल्या कामात आज यश मिळेल. आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बोलण्यात गोडवा ठेवला तर तुमच्या कामाला यश येईल.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी आज दान-पुण्य करण्यात रूची येइल.समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज भावंडांकडून तुम्हाला मदत होईल. तसेच नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही आज लाभ होऊ शकतो फक्त काळजीपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे आहे. आज जर मालमत्ता घेण्याच्या विचारात असाल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा अडचण होऊ शकते.

तूळ – आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला तुमच्या मनातली गोष्ट बोलू शकता. वडिलांचा सल्ला घेऊन आज तुम्ही मुलांसंबंधित निर्णय घेऊ शकता. हा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आजचा दिवस नोकरीसाठी उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. आणि जीवनसाथीला मान द्या. आज त्यांना तुम्ही भेटवस्तू देखील देऊ शकता. तसेच मित्रांसोबत फिरायला जाण्याचेही योग बनत आहेत.

वृश्चिक – आज व्यवसायाच्या ठिकणी काळजी बाळगा. शत्रू वरचढ ठरू शकता पण घरात वातावरण शांतीचे आणि आनंदाचे जाईल. आज कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तब्येत बिघडल्यास त्वरित दवाखान्यात घेऊन जा. तसेच आजचा दिवस नोकरदारांसाठी देखल चांगला आहे. कामाची संधी मिळू शकते.

धनु – आज अचानक मोठा धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. आज नोकरीत वादविवादात पडू नका. वाणी वर नियंत्रण ठेवल्यास आजचा दिवस उत्तम आहे. भविष्याची चिंता कमी होईल. मुलांच्या संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, तरी जबाबदारीने आणि मुलांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा.

मकर – आज तुमचा दिवस धावपळीचा असेल पण तुम्ही कुटुंबाला आणि जीवनसाथीला वेळ देऊ शकाल. त्यामुळे आनंदी दिवस जाईल. आज रखडलेले किंवा राहून गेलेले सगळे कामं पुर्ण करावे लागतील. अन्यथा अडचणी निर्माण होतील. आज सासुरवाडीकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होईल.

कुंभ – आज नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. आज मालमत्ता गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. आज मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आज मित्रांचा सहवास लाभेल. आणि त्यांच्याकडुन भेटवस्तू मिळू शकते. आज आईची विशेष काळजी घ्या. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात प्रवास घडू शकतो.

मीन – आजच दिवस उत्तम आहे. आजच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमचा वेळ आज उत्तम व्यतीत होईल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत. आज व्यवसायात तुम्हाला भावाची मदत घ्यावी लागू शकते. आज लग्नयोग्य व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. एखादे शुभ कार्य आज होऊ शकते.

Title – What is Your Horoscope Today. Know who will get Big Profit 

Join WhatsApp Group

Join Now