कुंभसह ‘या’ राशींना आज मिळणार शुभवार्ता, वाचा राशीभविष्य!

On: September 28, 2024 9:38 AM
Horoscope Today 28 September
---Advertisement---

Horoscope Today | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. (Horoscope Today)

दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार आज 28 सप्टेंबरचा दिवस मकर, कुंभ आणि मीन या राशीसाठी अत्यंत शुभ असणार आहे. आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ होणार आहे.

मकर रास

नोकरी- आज कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. फक्त जास्त घाई करू नका, अन्यथा घाईमध्ये कामे बिघडू शकतात.
व्यवसाय- आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही हाती घेतलेले सर्व काम आज पूर्ण होईल. यशस्वी होईल.
विद्यार्थी- आज तुम्हाला नवीन संधी मिळतील, त्या संधीचा फायदा घ्या. तुमच्या कलेला वाव मिळेल. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.
आरोग्य- बाहेरचे पदार्थ खाऊ नका.तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. (Horoscope Today)

कुंभ रास

नोकरी- आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल.
व्यवसाय- व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन ग्राहक मिळतील, त्यामुळे व्यवसाय वाढीस लागेल. (Horoscope Today)
विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.
आरोग्य- तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. घरचे आणि पौष्टिक अन्न खा, आरोग्य चांगले राहील.

मीन रास

नोकरी- वरिष्ठ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मदत करतील, आज जास्त कामाचा लोड असणार नाही. त्यामुळे आजचा दिवस जरा आरामदायी जाईल. तर, काही जणांचा आज नोकरीचा शोध पूर्ण होईल, त्यांना नोकरीसाठी कॉल येईल.
व्यवसाय- आज तुम्हाला नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होईल.
विद्यार्थी- अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं. कलेला वाव देणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हाल. (Horoscope Today)
आरोग्य- तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी.

News Title : Horoscope Today 28 September

महत्वाच्या बातम्या –

सोनं-चांदी सुसाट, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ; जाणून घ्या आजचे भाव

महिन्याच्या शेवटी दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली घसरण?

सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंची बाजी, युवासेनेने उडवला अभाविपचा धुव्वा

आज शनीदेव ‘या’ राशींच्या जीवनात धन-सुखाचा पाऊस पाडणार!

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणे अडचणीत

Join WhatsApp Group

Join Now