Honey Singh | रॅप गाण्यांमुळे प्रसिद्धीस आलेला गायक हनी सिंह सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने गीतकार गुलजार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बीड़ी जलाईले’ या गाण्याचा संदर्भ देत हनी सिंहने मोठं विधान केलंय. गुलजार यांनी स्त्रीविरोधी गाणी लिहिली, असं त्याने म्हटलं आहे.(Honey Singh)
‘बेगानी नजर’, ‘लक 28 कुड़ी दा’,’आज ब्लू है पानी पानी’ अशा गाण्यांमुळे हनी सिंहला प्रसिद्धी मिळाली. बॉलीवूडमध्ये एकेकाळी त्याची चांगलीच हवा होती. मात्र, काही वर्षांपासून त्याची खूप कमी गाणी रिलीज झाली. ज्या गाण्यांमुळे हनी सिंहला प्रसिद्धी मिळाली, बऱ्याचदा त्या गाण्यांच्या बोलवरून त्याला खडेबोल देखील सुनावले गेले.
‘बीड़ी जलाई ले’ गाण्यावरून हनी सिंहने गुलजार यांना डिवचलं
हनी सिंहच्या गाण्यातील बोलमुळे त्याच्यावर बऱ्याचदा टीका झाली आहे. आता या टीकेवर हनी सिंहने मौन सोडलं आहे. त्याने गीतकार गुलजार यांच्या गाण्यांचा संदर्भ देत आपल्या वरील होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हनी सिंहने मोठं वक्तव्य केलं.
“मी याकडे जास्त लक्ष देत नाही. पण मी याला उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. गुलजार यांनी लिहिलं आहे की, ‘बीड़ी जलाई ले, जिगर से पिया जिगर मा बड़ी आग है’ महिलांचं जिगर (हृदय) कुठे असतं? मला हे ‘स्त्रीविरोधी’ वाटतं,” असं हनी सिंह(Honey Singh) म्हणाला आहे.
गुलजार यांना लिजेंड म्हटलं जातं, मग मला शिव्या का?
तसेच ‘ज़बान पे लागा रे, नमक इश्क का’ इथे ते महिलेच्या जीभेबद्दल का बोलत आहेत? फक्त मीच चुकीचा कसा?, असा सवाल देखील हनी सिंहने उपस्थित केला आहे. “मी महिलांना ऑब्जेक्टीफाय करत नाहीये. आधी कशी कशी गाणी असायची. त्यांच्याकडे मात्र गाणी म्हणून पाहिलं जायचं. मी चोली के पिछे क्या हैं सारख्या वादग्रस्त गाण्यांबद्दल तर बोलतच नाहीये.”, असं देखील हनी सिंह (Honey Singh) म्हणाला.
“सगळ्या शिव्या हनी सिंगलाच दिल्या जातात आणि इतरांना लिजेंड बोललं जात आहे, असं का?, आपण मॉर्डनही होतोय पण जुने विचारही सोडत नाहीये.”, असा टोला देखील हनी सिंहने लगावला आहे. हनी सिंहचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.
News Title – Honey Singh criticizes lyricist Gulzar
महत्वाच्या बातम्या-
सोनं पुन्हा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
शरद पवारांचं धक्कातंत्र सुरूच, पुण्यात भाजपच्या बड्या नेत्याकडून ‘तुतारी’चा प्रचार
देशात आढळला पहिला मंकीपॉक्स संशयित रुग्ण?, ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींवर बरसणार सुखाच्या सरी, मिळेल शुभवार्ता






