होमिओपॅथी डॉक्टरांसाठी खूशखबर, अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासंदर्भात मोठा निर्णय

On: December 29, 2024 1:47 PM
Homeopathy Doctors
---Advertisement---

Mumbai : होमिओपॅथीची प्रॅक्टिस (Homeopathy Doctors) करत असलेले डॉक्टर रुग्णांना अ‍ॅलोपॅथिक औषधे लिहून देऊ शकणार आहेत. त्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देणारे पत्रक अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) काढले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या निर्णयाला विरोध केला आहे.

एक वर्षाचा कोर्स आवश्यक-

होमिओपॅथीच्या ज्या डॉक्टरांनी शासनमान्य वैद्यकीय महाविद्यालयांतून ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांनाच अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येणार आहे.

आयएमएचा विरोध-

“होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू करू देण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही यापूर्वीच कोर्टात गेलो होतो. अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधातही आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी द्यायची, हे योग्य नाही,” असे डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, आयएमए (महाराष्ट्र) यांनी म्हटले आहे.

१० हजार जणांनी पूर्ण केला अभ्यासक्रम-

अन्न व औषध प्रशासनाच्या पत्रकात नमूद आहे की, होमिओपॅथीच्या डॉक्टरांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. राज्यभरात ८० हजार होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यातील दहा हजार जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांनाच अ‍ॅलोपॅथीची २० ते २२ औषधे लिहून देता येणार आहेत.

आयुष संचालनालयाचा अखत्यारीतील विषय-

होमिओपॅथी हा विषय आयुष संचालनालयाच्या अखत्यारित येतो. अनेक गावांमध्ये हे होमिओपॅथी डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहून देण्याची परवानगी देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

News Title: Homeopathy Doctors Can Now Practice Allopathy: FDA Circular, IMA Opposes

महत्त्वाच्या बातम्या- 

काय सांगता!, १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?

वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!

सतीश वाघ हत्या प्रकरणाला नवं वळण, पत्नी मोहिनीचे पतीबद्दल धक्कादायक खुलासे

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू, व्हिडीओ तूफान व्हायरल!

संतोष देशमुख प्रकरणी संभाजीराजेंचा संताप, ‘म्हणाले अजित दादांना मी…’

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now