सावधान! HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी

On: January 6, 2025 12:44 PM
HMPV Virus
---Advertisement---

HMPV Virus l चीनमधील HMPV या नव्या व्हायरसने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कारण आता चीननंतर भारतातही HMPV या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात 8 महिन्यांच्या मुलाला HMPV या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे.

भारतात आढळला पहिला रुग्ण :

बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनी HMPV व्हायरसची पुष्टी केली आहे. त्यामुळे आता कर्नाटक आरोग्य विभागाने आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत माहिती देखील दिली आहे.

यासंदर्भात आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे. HMPV व्हायरस हा जास्त प्रमाणात घातक नाही, पण या आजाराची जर साथ पसरत राहिली, तर कोविड प्रमाणेच जगभरात महामारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आधीच योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

HMPV Virus l बचाव कसा करावा :

– जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमालाने झाका.
– सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
– ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
– भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा

‘या’ गोष्टी करू नये :

– हस्तांदोलन चुकूनही करू नये.
– टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये.
– आजारी लोकांशी जवळचा संपर्क करू नये.
– डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

News Title : hmpv first case in india

महत्वाच्या बातम्या –

खळबळजनक! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

सरपंच हत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, SIT मधून ‘त्या’ अधिकाऱ्यांना हटवलं

HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; जाणून घ्या लक्षणं

नववर्षात गुड न्यूज, लाडक्या बहीणींनो 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?

17 मोबाईल नंबर, 100 बँक खाती अन्..; वाल्मिक कराडबाबत सुरेश धसांचा मोठा खुलासा

 

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now