Gold Silver Rate | सोने-चांदीच्या दारात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरांनी सलग तेजी दाखवत ३० वर्षांचा उच्चांक गाठला होता. सप्टेंबर २०२५ मध्ये सोन्याने तब्बल ११.८५% परतावा दिला, जो गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठा मासिक परतावा ठरला. मात्र, बाजारात अचानक मोठी घसरण (Correction) झाली आहे.
जागतिक पातळीवर डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन बाँड यिल्ड वाढल्याने मौल्यवान धातूंवर मोठा दबाव आला. सोन्याचे दर जवळपास ₹२,००० प्रति १० ग्रॅमने खाली घसरले, तर चांदीचे दर तब्बल ₹३,६५० प्रति किलोने घसरले आहेत.
मंगळवारी प्रत्यक्षात असेच झाले. जागतिक पातळीवर डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन बॉण्ड यिल्ड वाढल्याने सोन्या–चांदीवर दबाव वाढला आहे. सोनं जवळपास २,००० प्रति १० ग्रॅमने खाली घसरलं, तर चांदी तब्बल ३,६५० प्रति किलोने खाली आली. सोनं–चांदीतील अलीकडच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आता सेफ-हेवन ऍसेट्समधून नफा काढत आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.
पुढील मोठी घसरण कधी येऊ शकते?
कुठल्याही जागतिक संघर्षात (उदा. युद्ध, युद्धविराम (Ceasefire) झाला. जागतिक शांतता आणि राजकीय स्थिरता वाढल्यास, सुरक्षित गुंतवणुकीची (Safe-Haven Assets) गरज कमी होईल आणि गुंतवणूकदार नफा-वसुली (Profit-booking) करतील, ज्यामुळे दर आणखी खाली येतील.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
सोनं-चांदीतील अलीकडील तेजीनंतर गुंतवणूकदारांनी आता नफा काढण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या नवीन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची आहे, त्यांनी लगेच बाजारात उतरण्याऐवजी दरात आणखी घसरण होण्याची (Correction) वाट पाहणे योग्य ठरेल. तसेच ज्या जुन्या गुंतवणूकदाराकडे आधीच सोनं-चांदी आहे, त्यांनी ‘होल्ड’ करावे. कारण दीर्घकाळासाठी (Long-term) हे दोन्ही धातू तुमच्या पोर्टफोलिओचा एक महत्त्वाचा भाग राहतील, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शॉर्ट-टर्ममध्ये सोनं सुरक्षित पर्याय असला तरी, गेल्या दोन दशकांत इक्विटी (शेअर्स) आणि इतर अॅसेट्सनी सोन्यापेक्षा जास्त नफा दिला आहे. त्यामुळे दीर्घकाळासाठी ‘विविधतापूर्ण पोर्टफोलिओ’ (Diversified Portfolio) हेच योग्य धोरण आहे.






