Thane News | शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत नेते आनंद दिघेंच्या आठवणींवरून ठाण्यात पुन्हा राजकीय गदारोळ उडाला आहे. शिवसेना (उबठा) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या विषयी केलेल्या विधानानंतर ठाणे जिल्ह्यातून तुफान प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राऊत यांच्या विधानानंतर आता माजी महापौर रमेश वैती (Ramesh Vaiti) यांनी यामध्ये उडी घेतली असून त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद आयोजित केली.
एकनाथ शिंदे यांचे पाय धुवून पाणी प्यावे :
रमेश वैती यांनी या पत्रकार परिषदेत शिवसेना (उबठा) पक्षाचे नेते राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की विचारे यांनी कोणताही त्याग केला नाही, त्यांनी केवळ लिंबू फिरवण्याचे काम केले. तसेच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मेहरबानीमुळे त्यांनी आमदार आणि खासदारपद प्राप्त केली आहेत. वैती यांनी पुढे हेही सांगितले की विचारे आणि राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे पाय धुवून पाणी प्यावे म्हणजे त्यांना अक्कल येईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्देशून म्हटले की, “शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे कार्य कोणीही मोजू शकत नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवा आणि जनसेवेसाठी समर्पित केले होते. जे लोक त्यांचा अपमान करतील त्यांना ते स्वतः आपला चमत्कार दाखवतील.
Thane News | कोण होते आनंद दिघे? :
आनंद दिघे (Anand Dighe) हे ९० च्या दशकात ठाणे शहरापासून ते वाडा मोखाड्यापर्यंत शिवसेनेचे स्थान मजबूत करणारे नेते होते. आनंद दिघे (Anand Dighe) यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढवली. २३ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले, पण आजही त्यांचा चाहता वर्ग कायम आहे. शिवसेनेत दोन गट असूनही दोन्ही गटातील नेते आणि शिवसैनिक दिघेंना गुरुस्थानी मानतात.
ठाण्यातील राजकीय वर्तुळात त्यांचे योगदान आदरयुक्त स्मरणात राहते. “शिवसेनेचा बालेकिल्ला-आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा” या घोषणेने ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेकांमध्ये त्यांच्या आधाराची आणि प्रभावाची जाणीव निर्माण केली.
यावरून असे दिसते की दिवंगत नेते आनंद दिघेंच्या (Anand Dighe) नावाने ठाणे जिल्ह्यातील शिवसेना अजूनही जोडलेली आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता या विधानामुळे अधिक गरम झाले आहे आणि, आगामी काळात यावरून अनेक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.






