तुरीचे भाव वाढले, हळदीचे भाव गडगडले… सोयाबीनचा नेमका भाव काय?

On: January 24, 2025 6:24 PM
Hingoli Market Tur prices rise Turmeric prices fall
---Advertisement---

Hingoli Market | हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात (Hingoli Market) दोन दिवसांपासून तुरीच्या भावात दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे, तर हळदीच्या भावात घसरण झाली आहे. याशिवाय सोयाबीनची दरकोंडी कायम असल्याचे चित्र आहे. यंदा नैसर्गिक संकटांमुळे सोयाबीन (Soybean Rates) उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच भावही समाधानकारक मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात (Financial Crisis for Farmers) सापडला आहे.

तुरीच्या दरात (Tur Prices) किंचित वाढ-

आता शेतकऱ्यांकडे तूर उपलब्ध झाली आहे. चार दिवसांपासून तुरीच्या दरात किंचित वाढ झाली असली तरी, मागील वर्षीच्या तुलनेत सध्याचा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऑगस्ट, सप्टेंबर २०२४ मध्ये तुरीने १० ते ११ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. त्या तुलनेत सध्या अडीच ते तीन हजार रुपयांनी भाव कमी मिळत आहे. २३ जानेवारी रोजी मोंढ्यात २५० क्विंटल तुरीची आवक (Tur Prices in Maharashtra) झाली होती. किमान ७ हजार २५ ते कमाल ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर एक-दोन शेतकऱ्यांची तूर ८ हजाराने विक्री झाली.

हळदीच्या दरात झाली घसरण-

हळदीच्या (Turmeric Rames in Maharashtra) दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली असून, गुरुवारी  सरासरी १२ हजार ५०० रुपयाने हळद विक्री झाली. (Hingoli Market)

सोयाबीनला (Soybean Rates) अपेक्षित भाव नाही-

यंदा नैसर्गिक संकटांचा फटका सोयाबीन पिकाला (Soybean Crop Rates) सर्वाधिक बसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे किमान सहा हजारांचा भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, यंदा सरासरी चार हजारावर सोयाबीन गेले नाही. येणाऱ्या दिवसांतही भाववाढीची (Price Hike Soyabean) शक्यता कमीच असल्याचे व्यापारी (Traders) सांगत असल्याने आता शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत आहेत.

संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची सरासरी आवक मंदावली आहे. हंगामात चार ते पाच हजार क्विंटलवर आवक गेली होती. आता मात्र सरासरी ८०० ते एक हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे. गुरुवारी (२३ जानेवारी) रोजी ८२० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. ११ हजार ५०० ते १३ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. (Hingoli Market)

मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल-

शेतमाल (Produce) आवक (क्विंटलमध्ये) (Arrival in Quintals) सरासरी भाव (Average Price)
गहू (Wheat) ६५ २,७४०
ज्वारी (Sorghum) ३५ १,९१०
तूर (Tur) २५० ७,२२५
सोयाबीन (Soybean) ८०५ ४,०७०
हळद (Turmeric) ८२० १२,५०२

 

Title : Hingoli Market Tur prices rise Turmeric prices fall  Soybean prices remain low

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now