हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना मोठा झटका; कोट्यवधी रुपये बुडाले

On: August 12, 2024 12:07 PM
Adani Group
---Advertisement---

Hindenburg Report | अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने मागच्या वर्षी अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. अशात याच फर्मचा एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. यावेळी त्यांनी सेबी अध्यक्षांवरच आरोप केला आहे. अदानींच्या शेअर्स कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा होता, असा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Hindenburg Report )

हिंडनबर्गच्या या रिपोर्टमुळे अदानी ग्रुपला मोठा झटका बसला आहे. आज (12 ऑगस्ट) सकाळी शेअर बाजार उघडताच अदानी ग्रुपचे 1.28 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. अदानींच्या बहुतांश शेअर्समध्ये 4 ते 6 टक्क्यांची घसरण दिसून आली. यामुळे ग्रुपची मार्केट कॅप 16 लाख कोटी रुपयांनी खाली आली आहे.

अदानींच्या शेअर्समध्ये घसरण

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सध्या 4 टक्क्यांनी घसरून 3060 रुपयांवर आल्याचे दिसून आले. तर, ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीचे शेअर्स 5.27 टक्क्यांनी घसरले आणि 3018.55 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 3186.80 रुपयांवर बंद झाला.(Hindenburg Report )

अदानी पोर्ट अँड एसईझेडचे शेअर्स सध्या 2.17 टक्क्यांनी 1500 रुपयांवर घसरल्याचे दिसत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आणि 1457.35 रुपयांवर पोहोचले. तसेच, अदानी पॉवरचे शेअर्स 3.14 टक्क्यांनी घसरून 673.25 रुपयांवर आले. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 695.10 रुपयांवर बंद झाले.

याचबरोबर अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 2.28 टक्क्यांनी घसरून 1078.90 रुपयांवर आले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1104.10 रुपयांवर बंद झाला होता. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 3.18 टक्क्यांनी घसरून 1723.45 वर पोहोचला. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 7 टक्के घसरून 1656.05 वर पोहोचला.

कोणत्या कंपनीचे नुकसान झाले?

अदानी एंटरप्रायझेसचे 19,184.91 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 3,44,193.75 कोटी रुपयांवर आली. तसेच, अदानी पोर्ट आणि एसईझेचे 16,406.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी पॉवरचे 29,351.31 कोटी रुपयांचे नुकसान झाले.अदानी एनर्जी सोल्युशन्सचे 22,632.16 कोटी रुपये बुडाले आहेत.(Hindenburg Report )

त्याचबरोबर अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर या कंपन्यांचे देखील नुकसान झाले आहे. अंबुजा सिमेंटचे 3,952.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 1,51,729.35 कोटी रुपये झाले आहे.

News Title-  Hindenburg Report Adani Group shares fell

महत्वाच्या बातम्या-

वाहनचालकांना झटका! ‘या’ शहरांत पेट्रोल महागलं, जाणून घ्या आजचे दर

तुम्हीही कर्ज घेतले आहे का? तर CIBIL बाबतचा नवीन नियम नक्की जाणून घ्या

मोठी बातमी! अजित पवारांच्या जीवाला धोका? कार्यकर्ते टेन्शनमध्ये

“दोन-चार कपडे काढले असते तर..”; विनेश फोगाटबद्दल भाजप नेत्याची वादग्रस्त पोस्ट

महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा

Join WhatsApp Group

Join Now