Hina Khan l ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खान सध्या कठीण काळातून जात आहे. कारण अभिनेत्री हीनाला ब्रेस्ट कॅन्सर या आजारासोबतच आणखी एका आजाराने ग्रासले आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. आता हिना खानच्या नव्या आजाराची बातमी ऐकल्यानंतर तिचे चाहते पुन्हा काळजीत पडले आहेत. तर आज आपण हिना खानला कोणता आजार झाला आहे आणि त्या आजाराची लक्षणे आणि उपचार काय आहेत? हे जाणून घेऊयात…
हिना खानला झाला ‘हा’ आजार :
हिना खानला आता म्यूकोसायटिसचा त्रास झाला आहे. ब्रेस्ट कॅन्सरसोबतच ती आता या आजाराशी देखील लढत आहे. केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे हे घडल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. अशातच हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे.
त्यामध्ये ती म्हणाली की, ‘थकलेले मन आणि धीर, जरा धीर धरा. अल्लाह, कृपया आमच्या प्रत्येक लहान मोठ्या प्रार्थना स्वीकार. अभिनेत्रीने उघड केले की तिला तिसऱ्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सरमुळे म्यूकोसिटिस हा आजार झाला आहे. तसेच ती डॉक्टरांच्या प्रत्येक सल्ल्याचे पालन करत आहे.
Hina Khan l म्यूकोसिटिस रोग म्हणजे काय? :
या आजारात पचनसंस्थेवर परिणाम होतो. शरीरात सूज आणि जखमा होऊ लागतात. मुख्यतः तोंड, घसा, पोट, आतडे, गुद्द्वार आणि अन्ननलिका प्रभावित होतात. त्यामुळे रुग्णाला खाण्यापिण्यात त्रास होऊ लागतो
म्यूकोसिटिसची लक्षणे काय आहेत? :
– ओठ, तोंड किंवा घशात फोड येणे.
– गिळताना त्रास होणे आणि छातीत दुखणे.
– तोंड आणि घशात जास्त लाळ येणे.
– शरीरावर जखमा होणे.
– ताप येणे
– दात आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव येणे.
News Title – Hina Khan diagnosed with mucositis
महत्त्वाच्या बातम्या-
…XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही; पंकजा मुंडे असं कोणत्या नेत्याला म्हणाल्या
वस्तादने एक डाव राखून ठेवलाय; बापासोबत कायम राहा…; अजितदादांचा सल्ला
कोरोनापेक्षाही धोकादायक आजार; शरीराचा ‘हा’ भाग करतोय खराब






