पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

On: September 28, 2025 10:23 AM
IMD Weather Alert
---Advertisement---

Maharashtra Weather Update | भारतीय हवामान विभागाने (IMD) 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. कोकण (Kokan), मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) या भागांत जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने स्पष्ट केले आहे. या भागांतील नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश

संभाव्य अतिवृष्टीच्या (Heavy rainfall) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांना संपूर्ण तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका तर नद्यांच्या पाणीपातळीमुळे फ्लॅश फ्लड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवण्याचे आदेश. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तयार ठेवणे.
जुन्या व धोकादायक इमारतींसाठी सुरक्षा उपाय.
वीजपुरवठा आणि रस्ते दुरुस्ती पथक तत्पर ठेवणे.
मध्यम धरणांचा साठा व विसर्ग नियमित तपासणे.

तसेच नागरिकांना सतर्क ठेवण्यासाठी आपत्तीपूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांतून प्रसारित करण्यात येणार आहेत.

नागरिकांसाठी सूचना :- अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.
धोकादायक व पूरप्रवण भाग टाळावेत.
वीज पडत असताना झाडाखाली उभे राहू नये.
नद्या-नाल्यांवरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
आपत्तीच्या वेळी स्थानिक निवारा केंद्रांचा वापर करावा.
अनावश्यक प्रवास व पर्यटन टाळावे.

राज्यातील आपत्कालीन संपर्क क्रमांक

धाराशीव : 02472-227301
बीड : 02442-299299
परभणी : 02452-226400
लातूर : 02382-220204
रत्नागिरी : 7057222233
सिंधुदुर्ग : 02362-228847
पुणे : 9370960061
सोलापूर : 0217-273101२
अहमदनगर : 0241-2323844
नांदेड : 02462-235077
रायगड : 8275152363
पालघर : 02525-297474
ठाणे : 9372338827
सातारा : 02162-232349
मुंबई (शहर व उपनगर) : 1916 / 022-69403344

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (24×7) :-
022-22027990
022-22794229
022-22023039
9321587143

News Title – Heavy Rainfall Alert in Maharashtra for the Next Three Days; Konkan, Marathwada and Central Maharashtra Likely to Witness Intense Showers.

Join WhatsApp Group

Join Now