राज्यात पावसाचे सावट गडद; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: October 20, 2025 10:12 AM
Maharashtra Rain Update
---Advertisement---

Weather Update | मोसमी पावसाचे ढग परतले असले तरी, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी सुरूच आहे. दिवाळीच्या तोंडावरही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department – IMD) आगामी काही दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील आठवडा पावसाचा, अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा :

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, २० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu), लक्षद्वीप (Lakshadweep), पुद्दुचेरी (Puducherry), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnataka) आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज कोल्हापूर (Kolhapur), सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच, पुणे (Pune), रत्नागिरी (Ratnagiri), सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि लातूर (Latur) या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील आठवडाभर पावसाचा प्रभाव राहणार असून, २१ ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. छत्तीसगड (Chhattisgarh), नागालँड (Nagaland), मणिपूर (Manipur), मिझोरम (Mizoram) आणि त्रिपुरामध्येही (Tripura) वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

Weather Update | कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता :

राज्यातील पावसाचे संकट अद्याप टळलेले नाही. पुढील तीन दिवसांत कोकण (Konkan), गोवा (Goa), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे दिवाळीच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra weather update)

सध्या अंदमान समुद्र (Andaman Sea) आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. या स्थितीमुळे २४ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम म्हणून राज्यात पुढील काही दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीतही नागरिकांना छत्र्या घेऊनच बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे.

News title : Heavy Rain Alert Maharashtra Till Diwali

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now