राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

On: April 14, 2026 12:24 PM
Maharashtra Heatwave Alert
---Advertisement---

Maharashtra Heatwave Alert | राज्यात एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. IMD कडून 14 एप्रिलपासून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागात दमट वातावरण तर इतर ठिकाणी प्रखर उष्णता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोकणासह उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढ :

मुंबई (Mumbai) आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात उकाड्याने नागरिकांची प्रचंड दमछाक होत आहे. ठाणे (Thane) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, पुढील दिवसांत हा इशारा संपूर्ण किनारी भागात लागू होणार आहे. या भागात तापमान 32 ते 35 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उष्णतेसोबत दमट वातावरणामुळे अस्वस्थता अधिक जाणवणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Heatwave Alert)

दरम्यान, नाशिक (Nashik), अहिल्यानगर (Ahilyanagar), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा जोर वाढताना दिसत आहे. या भागात कोरडे आणि उष्ण हवामान राहणार असून तापमान 38 ते 42 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Heatwave Alert | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तीव्र उष्णता :

पुणे (Pune), सोलापूर (Solapur), सांगली (Sangli), सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) या मध्य महाराष्ट्रातील भागांमध्येही उन्हाळा तीव्र होत आहे. आकाश स्वच्छ राहणार असल्यामुळे सूर्यप्रकाश अधिक तीव्र जाणवणार असून तापमान 38 ते 41 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः सांगली आणि सोलापूर येथे उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक असल्याने दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) परिसरातही उष्णतेची तीव्रता वाढत चालली आहे. सध्या 38 ते 42 अंशांदरम्यान असलेले तापमान 16 एप्रिलपासून आणखी वाढून काही ठिकाणी 43 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. विदर्भात नागपूर (Nagpur), अमरावती (Amravati) आणि अकोला (Akola) येथे तापमानाने आधीच 43 अंशांचा टप्पा ओलांडला असून अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 15 एप्रिलनंतर या भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

News title : Heatwave Alert Across Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now