‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: January 27, 2025 9:10 AM
Weather Update
---Advertisement---

Weather Update l राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात (Weather) सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) २७ जानेवारी रोजी उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार असून, नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

२७ जानेवारीला या भागातील आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

पुणेकरांना (Pune) दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अधिक जाणवतील. पुण्यात सकाळी धुके (Fog) पडण्याची शक्यता असून, त्यानंतर आकाश निरभ्र राहील. पुण्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.

जिल्हानिहाय तापमान अंदाज :

कोल्हापूर: किमान १४ अंश सेल्सिअस, कमाल ३३ अंश सेल्सिअस
सातारा: किमान १६ अंश सेल्सिअस, कमाल ३३ अंश सेल्सिअस
सोलापूर: किमान १९ अंश सेल्सिअस, कमाल ३४ अंश सेल्सिअस
सांगली: किमान १७ अंश सेल्सिअस, कमाल ३४ अंश सेल्सिअस

दिवस आणि रात्रीच्या तापमानातील या तफावतीमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Weather Update l शेतकरी आणि पशुपालकांसाठी सूचना :

उष्णतेच्या या लाटेचा (Heat Wave) विचार करून शेतकऱ्यांनी (Farmers) पिकांना आवश्यक पाणी द्यावे आणि पिकांचे उन्हापासून संरक्षण करावे. जनावरांसाठी (Cattle) सावलीची व्यवस्था करावी आणि त्यांना पुरेसे पाणी मिळेल याची खबरदारी घ्यावी. उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघात (Heat Stroke) आणि डिहायड्रेशनचा (Dehydration) धोका वाढतो. त्यामुळे पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना :

-दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
-बाहेर पडण्याची गरज भासल्यास हलके, सुती आणि सैलसर कपडे परिधान करावेत.
-उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा.
-शरीर हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्यासाठी भरपूर पाणी, फळांचे रस आणि लिंबूपाणी प्यावे.
-लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांनी विशेष काळजी घ्यावी. या घटकांवर उष्णतेचा लवकर आणि अधिक परिणाम होऊ शकतो.

News Title: heat-wave-in-western-maharashtra-temperature-likely-to-soar-on-january-27

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now