नागरिकांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच! अन्यथा हॉस्पिटलमध्ये मोजावे लागतील पैसे

On: April 30, 2024 1:14 PM
Heat Wave
---Advertisement---

Heat Wave l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच गेल्या काही तासांपूर्वी महाराष्ट्रातील काही भागात पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave Alert) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

या तीन जिल्ह्यात यलो अलर्ट जारी! :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट (Heat Wave Yellow Alert) देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर दोन दिवस राज्यात सामान्य वातावरण पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यात 3 मेपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

वाढत्या उष्णतेमुळे पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, मुंबई, ठाणे या भागात तापमान वाढण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Heat Wave l राज्यातील या भागात हवामान कोरड असणार! :

याशिवाय राज्यातील काही भागात हवामान कोरड असणार आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, नंदुरबार, पुणे, जळगाव, नाशिक. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा या भागात दमट आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील कोकण भागात काही प्रमाणात उष्णतेची लाट येणार आहे.

राज्यातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही भागात हवामान कोरड राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय हवामान निघणे वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

News Title: Heat Wave in Kokan Region 

महत्त्वाच्या बातम्या –

बीडमध्ये पंकजा मुंडे संकटात, या एका घटनेमुळे बजरंग सोनवणेंचं पारडं झालं जड

ग्राहकांसाठी आनंदवार्ता! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे रेट

“नकली शिवसेना म्हणायला ती काय मोदीजी तुमची डिग्री आहे का?”

पतंजलीला मोठा झटका, ही उत्पादनं वापरत असाल तर काळजी घ्या!

Covishield लस घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! रक्ताच्या गाठींसह होणार मोठे आजार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now