Oil For Cooking | निरोगी जीवनशैलीसाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. विशेषत: जेवण करताना कोणते तेल वापरावे, हा खूप मोठा प्रश्न पडतो. अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, आपण जे तेल स्वयंपाकासाठी वापरतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे तेल निवडताना ते विचार करूनच निवडायला हवे.या लेखात आरोग्यासाठी कोणते तेल चांगले आहे. याबाबत माहिती दिली आहे. (Oil For Cooking)
स्वयंपाकासाठी निरोगी तेल शोधत असाल, तर या लेखात तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तुम्ही वापरत असलेले तेल आरोग्याला फायदेशीर आहे का? स्वयंपाकासाठी योग्य तेल कसे निवडावे?, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?
काही अभ्यासात असे दिसून आले आहे की,आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑइलचे सेवन करणे फायदेशीर ठरते. ऑलिव्ह ऑइलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते आणि अनेक प्रकारच्या जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. याचबरोबर यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट देखील आढळते, ज्याला ऑलिक ऍसिड देखील म्हणतात. ऑलिक ऍसिडमध्ये कर्करोगविरोधी आणि अँटी इन्फ्लीमेन्टरी गुणधर्म आहेत.(Oil For Cooking)
दुसरे तेल म्हणजे ॲव्होकॅडो तेल आहे. हे तेल देखील आरोग्यासाठी गुणकारी ठरू शकते. या तेलामुळे यकृत खराब होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे हे दोन तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम समजले जातात.
काही अभ्यासकानुसार, सोयाबिन तेल, कॅनोला तेल, द्राक्षाच्या बियांचे तेल, तीळ आणि कॉर्न तेल आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात. तळण्यासाठी आणि बेकिंगसाठी ॲव्होकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल चांगला पर्याय आहे. तसेच, जेवण तयार करण्यासाठी उष्णकटिबंधीय भाज्यांचे तेल (Non-tropical vegetables) तुम्ही वापरू शकता. हा एक चांगला पर्याय आहे.(Oil For Cooking)
काही आहारतज्ज्ञ असंही म्हणतात की, जेवणात शक्यतो कमी तेल वापरावे. पदार्थ तयार करताना तेलाऐवजी इतर पर्यायांचा वापर करावा, जसे शुद्ध देशी तूप वापरा. पराठ्यावर तूप लावा. डाळी किंवा भाज्यांना तडका देण्याऐवजी मोहरी, तीळ किंवा शेंगदाण्याचे तेल वापरा.याचा आरोग्याला फायदा होतो. जेवणासाठी वनस्पती किंवा खोबऱ्याच्या तेलाचा वापर करणे टाळावे, कारण यामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असतात.(Oil For Cooking)
News Title- healthy Oil For Cooking
महत्त्वाच्या बातम्या –
“कंगना संसदेत बसायच्या लायकीची नाही, तिने..”; कुणी केली जहरी टीका?
सतर्क! वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार
गणेशोत्सवात ‘या’ नवसाला पावणाऱ्या बाप्पांचे घ्या दर्शन, सर्व संकटे होतील दूर
महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा!






