Entertainment News | अभिनेत्री मयुरी वाघने तिच्या वैवाहिक जीवनातील काळ्या अध्यायाबद्दल नुकतीच खुली कबुली दिली आहे. अस्मिता मालिकेनंतर सहकलाकार पियुष रानडेबरोबर विवाहबद्ध झालेल्या मयुरीने (Mayuri Wagh) डिवोर्सदरम्यान स्वतःवर झालेले मानसिक आणि शारिरीक त्रासाचे प्रसंग सांगितले. तिने या काळात किती भयंकर मानसिक तणाव अनुभवला, याची जिवंत उदाहरणे तिच्या कबुलीजबाबातून समोर आली आहेत.
लग्नाचा निर्णय लवकर घेतला
मयुरीने एका यूट्यूब मुलाखतीत सांगितलं की, “मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला. सहा महिन्यातच कळलं की निर्णय चुकीचा होता. माझ्या आई-बाबांना हे चार महिन्यांतच जाणवलं, पण मला हे कळायला दीड वर्ष गेलं.” ती पुढे म्हणाली, “ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला, तीच माझ्याविरोधात उभी राहील असं मला वाटलंच नव्हतं.” या काळात मयुरी फुलराणी या मालिकेत काम करत होती आणि तिने सांगितले की त्या काळात तिच्या सहकलाकारांनी तिला मानसिक आधार दिला.
मयुरीने उघड केलं की, “मी रात्री झोपायचे नाही. रात्री 2.30 वाजता मी मशीन लावायचे, किचनमधल सगळं बाहेर काढायचे, साबणाचं पाणी टाकून सगळं घासायचे. माझं डोकं शांत करायचं होतं.” ती पुढे म्हणाली, “शूट संपलं की माझे सहकलाकार माझ्याबरोबर यायचे. आम्ही पहाटे 3-4 वाजेपर्यंत बसायचो कारण मला एकटं राहवत नव्हत.
Entertainment News | “फिश टँकसमोर बसून बोलायचे…”
त्या मानसिक तणावाच्या काळात मयुरीने फिश टँक आणले आणि त्यातील मास्यांशीच ती बोलू लागली. “मी त्यांच्याशी बोलायचे, कारण मला कोणाशीतरी बोलायचं असायचं. मित्रमैत्रिणी होते पण त्यांच्यापुढे ते मांडायचं धाडस होत नव्हतं,” ती म्हणाली. “मला माझ्या आई-वडिलांना त्रास द्यायचा नव्हता, म्हणून मी त्यांच्यासमोरही रडत नव्हते. त्यामुळे आतापर्यंत त्यांना अनेक गोष्टी माहितीच नाहीत.”
मयुरीच्या मते, तिच्या सहकलाकारांनी त्या कठीण काळात तिचा हात धरला. “त्यांना कळत होतं की माझ्या आयुष्यात काहीतरी बिनसलंय, पण मी सांगू शकत नाहीये. तरी ते माझ्याजवळ असायचे.” या काळातील भावनिक संघर्षातून मयुरी बाहेर पडली, पण तिने सांगितलं की त्या अनुभवांनी तिला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवलं. (Mayuri Wagh News)
आज मयुरी वाघ पुन्हा आपल्या अभिनय कारकिर्दीत व्यस्त आहे. पण त्या काळातील आठवणींनी तिला मजबूत बनवलं आहे. “मी त्या काळात खूप काही शिकले. स्वतःला ओळखायला वेळ लागला, पण आता मी शांत आणि आत्मविश्वासाने जगतेय,” असं ती म्हणाली. तिच्या या कथेतून हे स्पष्ट होतं की, प्रसिद्धीच्या झगमगाटामागेही अनेकदा एकाकीपणा आणि वेदना लपलेल्या असतात.






