HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार!

On: November 4, 2024 11:47 AM
HDFC Bank
---Advertisement---

HDFC Bank UPI Services l देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC ची UPI सेवा या महिन्यात म्हणजेच दोन दिवस बंद राहणार आहेत. यामुळे आता ग्राहकांना Cash सोबत न बाळगणाऱ्यांची चांगलीच फजिती होणार आहे. तसेच आता ग्राहकांना कॅश सोबत ठेवावी लागणार आहे.

ट्रेडिंग खात्यांवरील सर्व प्रकारचे UPI व्यवहार देखील बंद पाहणार :

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, HDFC चे UPI हे उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत दोन तास बंद राहणार आहे. याशिवाय 23 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत देखील UPI तीन तास काम करणार नाही.

दरम्यान, ग्राहक HDFC बँक चालू आणि बचत खाती आणि RuPay क्रेडिट कार्डवर आर्थिक आणि गैर-आर्थिक UPI व्यवहार करू शकणार नाहीत. तसेच, तुम्ही बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप, Google Pay, WhatsApp Pay, Paytm किंवा इतर ॲप्सद्वारे कोणत्याही प्रकारचे UPI व्यवहार करू शकणार नाही. याशिवाय, बँकेशी जोडलेल्या ट्रेडिंग खात्यांवरील सर्व प्रकारचे UPI व्यवहार देखील बंद राहतील. कारण सिस्टीम अपग्रेडेशनसाठी बँकेनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

HDFC Bank UPI Services l ऑक्टोबरमध्ये झाले रेकॉर्ड ब्रेक :

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात UPI च्या माध्यमातून 16.58 अब्ज व्यवहार झाले आहेत. त्याची किंमत सुमारे 23.5 लाख कोटी रुपये होती. एप्रिल 2016 मध्ये UPI लाँच झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

ऑक्टोबरमध्ये दैनंदिन UPI ​​व्यवहारांची संख्या 535 दशलक्ष इतकी होती. या कालावधीत दररोज सरासरी व्यवहार मूल्य 75,801 कोटी रुपये होते. तर सप्टेंबरमध्ये दैनंदिन व्यवहारांची सरासरी संख्या 501 दशलक्ष होती आणि मूल्य 68,800 कोटी रुपये होते.

ऑक्टोबरमध्ये तात्काळ पेमेंट सेवेद्वारे (IMPS) 467 दशलक्ष व्यवहार झाले, जे सप्टेंबरच्या 430 दशलक्षच्या आकडेवारीपेक्षा 9 टक्के अधिक आहे. सप्टेंबरच्या 5.65 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या महिन्यात IMPS द्वारे व्यवहारांचे मूल्य 11 टक्क्यांनी वाढून 6.29 लाख कोटी रुपये झाले.

News Title – hdfc bank upi service will not available 2 days in november

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, अचानक का घेतला निर्णय?

दिवाळीच्या फराळातून पैसे वाटप; सांगलीत शरद पवारांचा उमेदवार अडचणीत?

सिनेइंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अजितदादांच्या उमेदवारांना शिंदेंकडूनच आव्हान; आता दोन्ही उमेदवार नॉट रीचेबल

“जिथं त्रास दिला, त्याला पाडायचंच..”, जरांगेंचे मतदारसंघ ठरले; वाचा संपूर्ण यादी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now