HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका! ग्राहकांचे EMI ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार

On: November 8, 2024 11:16 AM
HDFC Bank
---Advertisement---

HDFC Bank Interest Rates l एचडीएफसी बँकेने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेने कर्ज दरांची मार्जिनल कॉस्ट (MCLR) 5 बेस पॉइंट्स (bps) ने वाढला आहे. त्यामुळे आता HDFC बँकेचा MCLR व्याजदर 9.15% ते 9.50% च्या दरम्यान गेला आहे. तसेच हा नवीन दर 7 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाला आहे.

एका महिन्याचा MCLR वाढला :

बँकेने एका महिन्यासाठी 5 बेसिस पॉइंट्स आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी 3 बेसिस पॉइंट्सने व्याजदर वाढवला आहे. या दोन कालावधीशिवाय बँकेने कर्जाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तसेच आता MCLR 9.10% वरून 9.15% पर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे एका महिन्याचा MCLR 9.15% वरून 9.20% वर वाढला आहे.

तसेच बँक तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 9.30% ऑफर देते तर सहा महिन्यांच्या कालावधीसह MCLR 9.45% आहे. याशिवाय एका वर्षाच्या कालावधीसह MCLR 9.45% आहे, जो ग्राहकांच्या कर्जाशी जोडलेला आहे 9.45% आहे. तर दोन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR 9.45% आणि तीन वर्षांसाठी 9.50% आहे.

HDFC Bank Interest Rates l सर्व दर रेपो 6.50% वर आधारित :

HDFC बँकेने यापूर्वी 9 सप्टेंबर 2024 पासून त्यांचे व्याजदर बदलले आहेत. आता तुम्ही या बँकेकडून कर्ज घेतल्यास तुम्हाला वार्षिक 17.95% दराने व्याज द्यावे लागेल. याशिवाय, बँकेचा नवीन आधार दर देखील 9.45% झाला आहे. हे सर्व दर रेपो 6.50% वर आधारित आहेत.

रेपो रेट व्यतिरिक्त विशेष गृहकर्जाचा व्याज दर 2.25% ते 3.15% म्हणजेच 8.75% ते 9.65% पर्यंत असतो. याशिवाय, पगारदार आणि स्वयंरोजगारासाठी मानक गृहकर्ज दर रेपो दरापेक्षा 2.90% ते 3.45% अतिरिक्त आहे. म्हणजे ते 9.40% वरून 9.95% पर्यंत वाढते.

News Title : HDFC Bank Interest Rates

महत्वाच्या बातम्या –

मनसेसह शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का; तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी बांधलं शिवबंधन

सोन्याने दिली आनंदवार्ता! लग्न सराईपूर्वीच उतरले भाव; जाणून घ्या आजचे दर

“…नाहीतर ‘त्याला’ एक महिन्यात संपवू”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत

रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now