HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज; होईल फायदाच फायदा

On: October 12, 2025 11:31 AM
HDFC Bank
---Advertisement---

HDFC Bank | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, देशातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना एक मोठी खुशखबर दिली आहे. बँकेने आपल्या कर्जदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कर्जदारांवरील ईएमआयचा बोजा हलका होण्यास मदत होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर आलेला हा निर्णय ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

एमसीएलआर दरांमध्ये महत्त्वपूर्ण घट

एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) १५ बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात जाहीर केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे विविध प्रकारची कर्जे घेतलेल्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या दर कपातीचा थेट परिणाम गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांवर होणार आहे. त्यांचे मासिक हप्ते (ईएमआय) आता कमी होतील, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक नियोजनात अधिक सुलभता येईल.

असे असतील नवीन प्रभावी व्याजदर

व्याजदरात कपात लागू झाल्यानंतर, बँकेने विविध कालावधीसाठी नवीन एमसीएलआर दर निश्चित केले आहेत. हे नवीन दर ग्राहकांच्या कर्जावर तात्काळ प्रभावाने लागू होतील आणि त्यांच्या कर्जाच्या हप्त्यात घट दिसून येईल.

नवीन दरांनुसार, ओव्हरनाइट कर्जासाठी ८.४५ टक्के, एका महिन्याच्या कर्जासाठी ८.४० टक्के, तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ८.४५ टक्के, सहा महिन्यांसाठी ८.५५ टक्के आणि तीन वर्षांच्या मुदतीच्या कर्जासाठी ८.६५ टक्के व्याजदर आकारला जाईल.

News Title-  HDFC Bank Cuts Loan Rates Pre-Diwali

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now