टोरेस घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर!

On: January 18, 2025 9:44 AM
Torres Scam
---Advertisement---

Torres Scam l टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) मोठी कारवाई करत मुंबईतील (Mumbai) हवाला ऑपरेटर अल्पेश खारा (Alpesh Khara) (वय ५४) याला अटक केली आहे. या घोटाळ्याचा मास्टरमाईंड (Mastermind) असलेल्या युक्रेनमधील (Ukraine) आरोपींच्या सांगण्यावरून अल्पेशने कोट्यवधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

५२८९ गुंतवणूकदारांची (Investors) फसवणूक :

आतापर्यंत ५२८९ गुंतवणूकदार पुढे आले असून, त्यांच्या फसवणुकीचा (Fraud) आकडा ८३.६३ कोटींवर पोहोचला आहे. तक्रार अर्ज (Complaint Applications) स्वीकारण्याचे काम सुरूच असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने (Senior Officer) सांगितले. तक्रारदारांसाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त (Deputy Commissioner) संग्रामसिंह निशाणदार (Sangramsingh Nishandar) यांनी दिली आहे.

Torres Scam l अल्पेश खाराकडून हवाला व्यवहार :

टोरेस प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून अल्पेशचे नाव समोर आले होते. युक्रेनमधील पसार आरोपींच्या तो संपर्कात होता आणि त्यांच्या कार्यालयात त्याची ये-जा होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्पेशवर अटकेची कारवाई केली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर अल्पेशने हवाला व्यवहाराशी संबंधित सर्व नोंदी आणि पुरावे (Evidences) नष्ट केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे.

२७.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त :

टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण २७.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ६.७४ कोटींची रोकड (Cash), ४.५३ कोटींचे दागिने (Jewelry) आणि टोरेसच्या बँक खात्यातील (Bank Account) १५.८४ कोटी रुपयांचा समावेश आहे. जप्त केलेली कागदपत्रे (Documents) आणि डिजिटल पुराव्यांच्या (Digital Evidences) आधारे अधिक तपास सुरू आहे.

‘त्या’ तिजोरीतून (Vault) १७ लाखांची रोकड जप्त

टोरेसच्या कांदिवली (Kandivali) येथील शोरूममध्ये (Showroom) सापडलेल्या दोन तिजोऱ्या उघडण्यात पोलिसांना यश आले असून, त्यातून सुमारे १७ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Title : Hawala Operator arrested in Torres Scam, 27.13 lakhs seized
महत्वाच्या बातम्या- 

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर गुन्हेगाराने केलं असं काही की…, तपासात गुंता वाढला

बीडमध्ये चाललंय काय?, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ‘या’ घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, कारण ऐकून धक्का बसेल

आजचे राशिभविष्य- तुमचा कसा असेल आजचा दिवस?

तैमूरमुळे वाचला सैफ अली खान!, छोट्या तैमूरचा पराक्रम ऐकाल तर थक्क व्हाल

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now