Hasin Jahan | भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हसीन जहाँने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केवळ शमी कुटुंबीयांवरच नव्हे, तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावरही अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त टीका केली आहे. शमीच्या बहिणीचे नाव एका मनरेगा घोटाळ्यात (MNREGA Scam) आल्याच्या पार्श्वभूमीवर तिने हा हल्लाबोल केला आहे.
मोदी-योगींवर टीकास्त्र
हसीन जहाँने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर मोहम्मद शमीची बहीण शबीना (Shabina) आणि तिच्या सासरच्या मंडळींशी संबंधित मनरेगा वेतन घोटाळ्याच्या बातमीचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने एक लांबलचक आणि संतप्त प्रतिक्रिया लिहिली आहे. या प्रतिक्रियेत तिने शमी कुटुंबीयांवर अवैध कामे करण्याचा आरोप केला आहे, तसेच देशातील व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हसीन जहाँने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “भारत हा एक भ्रष्ट देश आहे… इथे गरिबांना अधिक गरीब करून त्यांचा छळ केला जातो… श्रीमंत महिलांना सुविधा आणि त्यांच्या बेकायदेशीर कामांना पाठिंबा दिला जातो.” इतकेच नाही, तर तिने थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटले, “काहीही असो, नरेंद्र मोदी आणि योगी हे शामी अहमदचे (मोहम्मद शमी) बाप बनलेत, सर्व बदमाशांना सरकारच्या ताकदीनं वाचवलं जाईल.” तिने अमरोहा (Amroha) पोलिसांवरही टीका करत ते तक्रारदारालाच धमकी देऊन प्रकरण मिटवतात, असा आरोप केला. तसेच, माध्यमांवरही सत्य दाखवण्याची हिंमत नसल्याचा आणि टीआरपीसाठी ‘पाय चाटण्याचा’ आरोप तिने केला आहे.
View this post on Instagram
काय आहे मनरेगा वेतन घोटाळ्याचे प्रकरण?
हसीन जहाँच्या या संतप्त प्रतिक्रियेमागे मोहम्मद शमीची बहीण शबीना आणि तिच्या कुटुंबीयांचे नाव मनरेगा वेतन घोटाळ्यात येणे हे कारण आहे. शबीना हिचे लग्न अमरोहा जिल्ह्यातील जोया ब्लॉकमधील (Joya block) पलौला (Paloula) गावातील मोहम्मद गजनबी (Mohammed Ghaznavi) याच्याशी झाले आहे. शबीनाची सासू गुले आयेशा (Gule Ayesha) या गावच्या प्रमुख आहेत. आरोप आहे की, शबीना आणि तिचा पती गजनबी यांनी स्वतःची मनरेगा कामगार म्हणून नोंदणी केली होती.
इतकेच नव्हे, तर गजनबीचे दोन भाऊ – अमीर सुहेल (Amir Suhail), जो लखनऊमध्ये (Lucknow) एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे, आणि शेखू (Shekhu), जो एलएलबी करत आहे – यांचेही मनरेगा जॉब कार्ड बनवून त्यांच्या खात्यात वेतन जमा करण्यात आले. या चौघांच्या खात्यात २०११ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान सुमारे २.६६ लाख रुपये मनरेगा वेतन म्हणून पाठवण्यात आल्याचा आरोप आहे (शबीना ₹७१,०१३, गजनबी ₹६५,०००, सुहेल ₹६३,८५१, शेखू ₹६७,०००). सरकारी निधीचा हा थेट गैरवापर असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी (District Magistrate) प्रकल्प संचालक अमरेंद्र प्रताप सिंह (Project Director Amarendra Pratap Singh) यांच्याकडे तपास सोपवला असून, ते गेल्या तीन वर्षांच्या नोंदी तपासत आहेत.
Title : Hasin Jahan Attacks Shami Family Modi Yogi MNREGA






