Hartalika 2024 l हिंदू धर्मात हरतालिका व्रत हा अविवाहित मुली आणि विवाहित महिलांसाठी महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, गोडवा मिळतो आणि मनोकामना पूर्ण होतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी उपवास करतात आणि अविवाहित मुली इच्छित वर मिळण्याच्या इच्छेने हे व्रत करतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
शुभ मुहूर्त काय आहे? :
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 वाजता सुरू होणार आहे आणि शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 वाजता समाप्त होणार आहे. उदयतिथीनुसार हरतालिका 6 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. ज्या महिला 6 सप्टेंबर रोजी हरतालिकेचे व्रत ठेवतील त्यांच्यासाठी पवित्र पूजेची वेळ फक्त 2 तास 31 मिनिटे असणार आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिला हरतालिका व्रत करतात मग त्यांना हे व्रत आयुष्यभर ठेवावे लागते, ते हे व्रत कधीही थांबवू शकत नाहीत. तसेच आजारपणात तुमचा नवरा तुमच्या जागी हे व्रत ठेवू शकतो. हरतालिका हा निर्जल व्रत आहे, त्यात कोणतेही अन्न किंवा पाणी सेवन केले जात नाही. हरतालिकेची पूजा प्रदोष कालात म्हणजेच संध्याकाळी, सूर्यास्ताच्या वेळी आणि रात्री होण्यापूर्वी केली जाते.
Hartalika 2024 l हरतालिका व्रताच्या दिवशी ‘या’ गोष्टी करा :
-या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी रात्रभर जागून भजन-कीर्तन करावे आणि उठल्यानंतर विधीप्रमाणे मातीच्या शिवलिंगाची पूजा करून पार्वतीची पूजा करून सिंदूर अर्पण करून उपवासाची सांगता करावी.
– हरतालिका तीजची उपासना व व्रत करण्याचा संकल्प करून व्रताची सुरुवात करावी आणि व्रताच्या दिवशी हरतालिका व्रत कथा अवश्य ऐकावी.
– पूजेसाठी, शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती स्वतःच्या हाताने मातीपासून बनवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन करावे.
News Title : Hartalika Vrat 2024
महत्वाच्या बातम्या-
गरोदर महिलांनो या महिन्यात आहे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ आणि तारीख
लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत वाद?; शिवसेना नेते दादांवर भडकले
शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरूंना द्या खास शुभेच्छा; शिक्षक होतील खूश
भाद्रपद महिन्यात नशिब फळफळणार, या ‘5’ राशीवाल्यांचं भाग्य उजळणार!
रुपाली चाकणकरांसाठी गुडन्यूज?, अजित पवार घेणार मोठा निर्णय






