आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त

On: September 6, 2024 8:50 AM
Hartalika Teej 2024  shubha muhurta   
---Advertisement---

Hartalika Teej 2024 | आज हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजेच ‘हरतालिकेचे व्रत’ केले जातात. आजच्या दिवशी लग्न झालेल्या महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. तर, कुमारिका या उत्तम वर मिळावा, यासाठी मनोभावे हरतालिकेचे व्रत करतात. आजच्या या शुभ दिनी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. यंदा हरितालिकेचा शुभ मुहूर्त नेमका कधी ते जाणून घेऊयात. (Hartalika Teej 2024 )

हरितालिका पूजा विधी-

आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास पूजेच्या वेळी केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. तसेच गणपती बाप्पाचा फोटो ठेऊन फळं, फुलं अर्पण करावी. आजच्या या शुभ दिनी एका दांपत्याची शिव-पार्वती मानून पूजा देखील केली जाते. त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा दिली जाते. (Hartalika Teej 2024 )

हरितालिका पूजेसाठी लागणारे साहित्य-

वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य पूजेसाठी लागते. (Hartalika Teej 2024)

पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?

5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी म्हणजेच (आज) पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल. (Hartalika Teej 2024)

News Title : Hartalika Teej 2024  shubha muhurta   

महत्वाच्या बातम्या- 

आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा

वनराज आंदेकरच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतली शपथ, म्हणाले ‘आता मी…’

इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ, दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! जयदीप आपटेला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

वयाच्या 40 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री झाली आई

Join WhatsApp Group

Join Now