इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ, दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ

On: September 5, 2024 5:59 PM
Harshwardhan Patil
---Advertisement---

Harshwardhan Patil | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार किंवा तुतारी हाती घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र हर्षवर्धन पाटलांची वेट अ‌ॅड वॉचची भूमिका होती. अशात इंदापूरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपचे इच्छुक उमेदवार असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलंय.

इंदापूरच्या राजकारणात खळबळ

महायुतीचे जागावाटप झालं नाही, पण अजित पवारांनी इंदापूरची जागा ही विद्यमान अमादार दत्तात्रय भरणे यांना मिळणार असे संकेत दिले होते. त्यावर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता भरणेंच्या वक्तव्याने इंदापूरच्या राजकारणात खळबळ उडालीये.

दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी एका गावात ग्रामस्थांशी बोलताना चक्क स्वत:ची उमेदवारीच जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. मी तुमच्यासाठी काम केलंय, मनापासून काम केलंय, तुम्हाला सभामंडप दिलं असेल, व्यक्तिगत कामासाठी माझा उपयोग झाला असेल तर मलाच आशीर्वाद द्या, असंही भरणे यांनी म्हटलंय. यानंतर हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Harshwardhan Patil | इंदापूर मतदारसंघावरून मोठा वाद

इंदापूर मतदारसंघावरून मोठा वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. ज्यासाठी पक्ष सोडला त्याच मुद्द्यावरून पुन्हा पक्ष सोडण्याची वेळ हर्षवर्धन पाटलांवर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रेतून इंदापूरात मोठी ताकद दाखवली. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती.

राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका, असा खणखणीत इशाराच त्यांनी नेतृत्वाला दिला आहे. उद्याची निवडणूक लढवायची की नाही हा प्रश्न आहे. उद्याच्या आमदारकीच्या निकालापेक्षा दहा वर्षे काही नसताना सोबत राहिली, ते निष्ठावन्त सोबत आहेत. म्हणून आज वेगळी ताकद निर्माण झाली आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

राष्ट्रवादीची यात्रा आली ते जे बोलले हा महायुतीचा धर्म आहे का? जागा वाटप व्हायचं आहे. कुणाला कुठलं जागा मिळायची हे बाकी आहे. अजित पवारांना जाहीर प्रश्न विचारतो. तुम्ही इंदापूरमध्ये येऊन काय सांगितलं. देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. तरीही, त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जाहीर काय केलं. इंदापूर च्या जनतेला दुखावण्याचा अधिकार नाही. हर्षवर्धन पाटील सर्व गोष्टी सहन करेल अपमान सहन करणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

 महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! जयदीप आपटेला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

वयाच्या 40 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री झाली आई

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; ठाकरे गटाला दिला मोठा धक्का

ठाकरेंच्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार? संभाव्य उमेदवारांची यादी

‘….म्हणून मी या अभिनेत्रीला सुरक्षा देतो’; सलमानच्या बाॅडीगार्डचा मोठा खुलासा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now