मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार, भाजपला ठोकला रामराम

On: October 4, 2024 1:44 PM
Harshvardhan Patil will enter Sharad Pawar group
---Advertisement---

Harshvardhan Patil | भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जाणार, अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. अखेर या सर्व चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे. (Harshvardhan Patil)

आज (4 ऑक्टोबर) हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. हा निर्णय घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्यायाचा स्वीकार करायला कार्यकर्त्यांचा होकार नसेल, व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो. असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांची मोठी घोषणा

हर्षवर्धन पाटील यांनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. सिल्व्हर ओकवर शरद पवारांसोबत काल त्यांची बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत देखील पाटील यांनी खुलासा केला. शरद पवार यांनी काल विधानसभा लढवण्याचा आग्रह धरला. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील, असं पवार म्हणाले असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

जनतेच्या भावना जाणूनच निर्णय घेतल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसंच इंदापुरात कोणाच्या स्वार्थासाठी निर्णय होत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. या तालुक्यात राजकीय निर्णय झाले आहेत ते जनतेच्या आग्रहामुळे झाले आहेत असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. (Harshvardhan Patil)

घोषणेपूर्वी फडणविसांची भेट घेतली

तसेच हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. मी आणि आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जाण्याचा निर्णय जाहीर केला. मी भाजपाचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांच्यासोबत 5 वर्ष काम केलंय. त्यात रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर सहकाऱ्यांशीही चर्चा केली. त्या सगळ्यांनाही माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. (Harshvardhan Patil)

“राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो. प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध असतात. आज मी हा निर्णय घेतला म्हणून इतरांशी संबंध दुरावले असं होत नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. संस्कृती जपण्याचे काम करतोय. भाजपा तालुकाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, माझ्यासहित भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करतोय.”, असं हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केलंय.

News Title – Harshvardhan Patil will enter Sharad Pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

आता भारतीय रेल्वेचंही होणार खासगीकरण?, रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

प्रतिक्षा संपली!’बिग बॉस 18′ मध्ये दिसणार ‘हे’ सेलेब्रिटी, पाहा यादी

‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस’ मराठी 5 चा विजेता?

सोनं खरेदी करावं की नाही?, दरवाढीचं सत्र सुरूच; जाणून घ्या आजचे दर

Join WhatsApp Group

Join Now