वर्ल्ड कप विजेत्या हरमनप्रीतची कमाई किती?; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

On: November 3, 2025 1:07 PM
Harmanpreet Kaur Net Worth
---Advertisement---

Harmanpreet Kaur Net Worth | भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women’s Cricket Team) नुकताच पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाने हे शक्य झाले. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ५२ धावांनी पराभव करत संघाने ट्रॉफी जिंकली. मैदानावर यशस्वी ठरलेली हरमनप्रीत (Harmanpreet) कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे.

बीसीसीआय करार आणि WPL पगार :

क्रिकट्रॅकरच्या (CrickTracker) अहवालानुसार, २०२४-२५ या वर्षासाठी हरमनप्रीतची (Harmanpreet) एकूण संपत्ती सुमारे २५ कोटी रुपये आहे. तिच्या उत्पन्नाचा मोठा वाटा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) (Board of Control for Cricket in India) येतो. ‘A’ श्रेणीच्या करारानुसार तिला वार्षिक ५० लाख रुपये मानधन मिळते.

याशिवाय, बीसीसीआयच्या (BCCI) समान वेतन धोरणामुळे, तिला प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय (ODI) सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी२० (T20) सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. WPL मध्ये ती मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कर्णधार असून, प्रत्येक हंगामासाठी तिला १.८० कोटी रुपये दिले जातात.

Harmanpreet Kaur Net Worth | ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर उत्पन्न :

क्रिकेट व्यतिरिक्त, हरमनप्रीत (Harmanpreet) जाहिरात विश्वातीलही एक मोठा चेहरा आहे. ती ब्रँड एंडोर्समेंटमधून (Brand Endorsements) दरवर्षी ४० ते ५० लाख रुपये कमावते. एका व्यावसायिक शूटसाठी ती सुमारे १० ते १२ लाख रुपये शुल्क आकारते. ती सध्या एच S D F C लाईफ (HDFC Life), आयटीसी (ITC), बूस्ट (Boost), सिएट (CEAT), प्युमा (PUMA), टाटा सफारी (TATA Safari) आणि एशियन पेंट्स (Asian Paints) यांसारख्या मोठ्या ब्रँड्सशी जोडलेली आहे.

हरमनप्रीत (Harmanpreet) पंजाब पोलीसमध्ये (Punjab Police) उपअधीक्षक (DSP) (Deputy Superintendent of Police) म्हणूनही कार्यरत आहे, जिथून तिला नियमित पगार मिळतो. तिने यापूर्वी महिला बिग बॅश लीग (WBBL) (Women’s Big Bash League) सारख्या आंतरराष्ट्रीय लीगमध्येही सहभाग घेतला आहे. तिची मुंबई (Mumbai) ते पटियाला (Patiala) पर्यंत मालमत्ता आहे.

News title : Harmanpreet Kaur: Net Worth, Salary

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now