Team India l क्रिकेट विश्वात भारतीय संघाने आपला ठसा उमटवला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून टीम इंडियाचे चाहते टेन्शनमध्ये आहेत. कारण बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकदामीच्या उद्घाटन समारंभातील एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे दोघेही एकमेकांना उदघाटनादरम्यान टाळत असल्याचं दिसत आहेत. मात्र आता या व्हिडीओवरून क्रिकेट चाहत्यांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
उद्घाटनादरम्यान नेमकं घडलं काय? :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनानिमित्त टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी या सोहळ्यातील अनेक मान्यवर मैदानावर येऊन खेळपट्टी आणि सुविधांची पाहणी करताना दिसत आहेत. मात्र यावेळी हार्दिक पंड्या काही मान्यवरांबरोबर आणि मोहम्मद शमी अन्य काही मान्यवरांबरोबर उभे असल्याचं दिसत आहे.
मात्र हे दोन्ही खेळाडू क्षणभरासाठी एकमेकांकडे पाहतात. मात्र दोघे ही एकमेकांना ओळख देखील दाखवत नसल्याचं व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर वाटतं आहे. यावेळी मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या एकमेकांना पाहून देखील दुर्लक्ष करत आहेत. तसेच त्यावेळी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना जाणूनबुजून दुर्लक्षित आहे का? की दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना नोटीस केलं नाही याबद्दल क्रिकेट चाहत्यांची देखील मतमतांतरे सोशल मीडियावर आहेत.
Hardik Pandya attended the inauguration ceremony of the New National Cricket Academy in Bangalore today. pic.twitter.com/JccniU7KIy
— Rohan Gangta (@rohan_gangta) September 28, 2024
Team India l या वादामुळे कटुता असेल का? :
हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी हे दोन्ही खेळाडू इंडियन प्रिमिअर लीगच्या स्पर्धेमध्ये गुजरात टायटन्स या संघाकडून खेळले होते. मात्र हार्दिक पंड्याने 2024 च्या आयपीएलपूर्वी गुजरात टायटन्सची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात प्रवेश केला आणि त्याने थेट कर्णधारपद भूषवलं आहे.
अशातच गेल्या काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये मोहम्मद शमीने हार्दिक पंड्या त्याच्या फिल्डींगवर प्रचंड नाराज होऊन मैदानातच त्याला अपशब्द बोलल्याचा त्याने एक किस्सा सांगितला होता. मात्र मोहम्मद शमीने बोलताना अगदी स्पष्टपणे हार्दिकचं सार्वजनिक ठिकाणी हे असं वागणं मला अजिबात पटलं नसल्याचं सांगितलं होतं. तसेच मोहम्मद शमीने आपण त्याचवेळी त्याला असं सार्वजनिक ठिकाणी बोलू नकोस असं सांगितल्याचं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे शमी आणि पंड्या मध्ये कटुता असेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
News Title : Hardik Pandya & Mohammad Shami Video Viral
महत्वाच्या बातम्या –
खतरों के खिलाडीच्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळालं बरचं काही? बक्षिसाची यादी पाहून व्हाल थक्क!
आज कर्कसह ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, उत्पन्न होणार डबल!
..आता याला काय म्हणावं?, मुंबईत शाळकरी मुलीने रचला स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव
राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे, पाहा कुठे-कुठे बरसणार पाऊस?
“गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहीणींना फक्त 1500 रुपये?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल






