घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने मुलाला दिले ‘इतक्या’ कोटींचे गिफ्ट; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

On: February 22, 2026 4:20 PM
Agastya Pandya
---Advertisement---

Agastya Pandya | भारतीय क्रिकेटविश्वातील आघाडीचा खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशासोबत विभक्त झाल्यानंतरही त्याने आपल्या कुटुंबासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने पूर्व पत्नी आणि मुलासाठी कोट्यवधींची आलिशान भेट दिल्याची चर्चा रंगली आहे.

हार्दिकच्या खासगी आयुष्याबाबत महत्वाची माहिती :

नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिकच्या खासगी आयुष्याबाबत अनेक घडामोडी समोर आल्या. तो सध्या माहिका शर्मा (Mahika Sharma) हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ते रोमँटिक अंदाजात दिसत होते. दोघेही एकमेकांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत असल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चा अधिक रंगली.

दरम्यान, त्यांच्या लग्नाचीही अफवा पसरली होती; मात्र व्हायरल झालेला फोटो हा पूजेदरम्यानचा असल्याचे स्पष्ट झाले. हार्दिकने नताशाला काही काळ डेट केल्यानंतर तिच्याशी विवाह केला होता आणि लग्नाआधीच ती गर्भवती होती. या दोघांना अगस्त्य (Agastya) नावाचा मुलगा आहे.

Agastya Pandya | मुलासाठी आलिशान एसयूव्ही भेट :

वैयक्तिक आयुष्यात बदल झाले असले तरी हार्दिक आपल्या पाच वर्षांच्या मुलावर अपार प्रेम करत असल्याचे दिसते. 2020 साली नताशाने अगस्त्यला जन्म दिला. घटस्फोटानंतरही हार्दिक वेळोवेळी मुलासोबतचे फोटो शेअर करत असतो. अलीकडेच त्याने मुलाला आणि माजी पत्नीला एक महागडी एसयूव्ही कार भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.

खेळण्याच्या वयात असलेल्या अगस्त्यसाठी तब्बल सुमारे 4 कोटी रुपये किमतीची लँड रोव्हर डिफेंडर (Land Rover Defender) टॉप मॉडेल कार खरेदी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही गाडी मुंबईतील नवनीत मोटर्स (Navnit Motors) येथून घेण्यात आली. कार डिलिव्हरीसाठी अगस्त्य आई नताशासोबत शोरूममध्ये उपस्थित होता. यावेळी गाडीच्या मागील बाजूस ‘पापा टू अगस्त्य’ अशी वेलकम नोट लिहिलेली दिसली. या संपूर्ण घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

News title : Hardik Pandya Gifts Luxury SUV Post Divorce

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now