“किती प्रॉपर्टी घेऊन चाललीस?”; हार्दिकपासून विभक्त होताच नताशा नेटकऱ्यांकडून ट्रोल

On: July 19, 2024 12:48 PM
Hardik-Natasha Divorce News Update
---Advertisement---

Hardik-Natasha Divorce | गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा गेम चेंजर खेळाडू हार्दिक पांड्या अनेक कारणांसाठी चर्चेत आला आहे.  नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटावरून जोरदार चर्चा होती. मात्र त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मागील सहा महिने हार्दिक पांड्यासाठी त्याच्या क्रिकेट करिअर आणि त्याच्या विवाहाला घेऊन अगदी संघर्षाचा काळ होता.

नताशा-हार्दिक आता अधिकृतरित्या वेगळे झाले असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.  हार्दिक आणि नताशाने दोन वेळा विवाह केला होता. 2020 आणि 2023 मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नाच्या अवघ्या 4 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेण्याचं निश्चित केलं आहे. (Hardik-Natasha Divorce)

हार्दिक आणि नताशाने घटस्फोटाची अधिकृतरित्या सुनावणी केली

नताशानेआपला मुलगा अगत्स्यासोबत  मुंबई सोडल्यानंतर घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर घटस्फोटाची अधिकृतरित्या सुनावणी केली आहे. हार्दिक आणि नताशाने त्यांचे सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन बंद केलं आहे. मात्र आता याला नेटकऱ्यांनी वेगळा मार्ग निवडत नताशाला ट्रोल करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. (Hardik-Natasha Divorce)

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

एका नेटकऱ्याने हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटावर कमेंट करत ‘विश्वास ठेवणं कठीण आहे’, असं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्याने लिहिलं आहे की, ‘इतक्या चांगल्या माणसाला ओळखू शकली नाही’ (Hardik-Natasha Divorce)

नेटकऱ्यांनी नताशाचा घेतला समाचार

तर, हार्दिकला यापेक्षा दुसरी चांगली मुलगी मिळेल असं एका युजरने म्हटलय. ‘सोडून दे तिला तिच्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल’ असं एका युजरने म्हटलं आहे. नताशाला घटस्फोटानंतर किती रक्कम मिळणार? याची देखील उत्सुकता आहे. ‘हार्दिक भय्या किती प्रॉपर्टी घेऊन चाललीय’, असं एका युजरने म्हटलं आहे. (Hardik-Natasha Divorce)

ट्रोलर्स मर्यादा ओलांडणार हे नताशाला ठाऊक असल्याने तिने कमेंट सेक्शन बंद केलं आहे. नताशाने सर्वात आधी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पांड्या आडनाव हटवलं. तसेच पांड्यासोबतचे काही फोटो देखील नताशाने डिलीट केल्याचं दिसून आलं आहे.

News Title – Hardik-Natasha Divorce News Update

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ भागात पावसाचा हाहाकार; शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकली

सर्वसामान्यांना दणका! टोमॅटोचे दर गगनाला भिडले, एक किलोचा भाव तब्बल ‘इतके’ रुपये

सावधान! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा!

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणारी वारकऱ्यांची जीप थेट विहिरीत कोसळली; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Join WhatsApp Group

Join Now