Operation Sindoor साठी वापरली हनुमान निती?, देशाच्या संरक्षणमंत्र्यांचं मोठं वक्तव्यं!

On: May 7, 2025 7:14 PM
Hanuman Niti Used in Operation Sindoor
---Advertisement---

Hanuman Niti | भारताच्या ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण देशात उत्साह आणि गौरवाची लाट पसरवली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईत हनुमान नीतीचा अवलंब केल्याचे जाहीर करत, भारताने अत्यंत मर्यादित आणि अचूक पद्धतीने दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचे स्पष्ट केले. या हल्ल्यामागे वापरली गेलेली हनुमान नीती नेमकी आहे काय ते समजून घेऊया. (Hanuman Niti)

ऑपरेशन सिंदूरसाठी हनुमान नीतीचा अवलंब?

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर अत्यंत अचूक सर्जिकल स्ट्राईक केले. या कारवाईविषयी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सांगितले की, भारताने केवळ ‘ज्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यांनाच प्रत्युत्तर दिले’. हे धोरण म्हणजेच ‘हनुमान नीती’ असल्याचे म्हटले.

हनुमान नीती म्हणजे काय? याचे उदाहरण त्यांनी अशोक वाटिकेत हनुमानजींनी केलेल्या कारवाईशी दिले. हनुमानजींनी केवळ राक्षसांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि सामान्य जनतेचे नुकसान टाळले. हाच आदर्श भारताने पाळला. राजनाथ सिंह म्हणाले, “जिन्ह मोही मारा तिन मोही मारे” म्हणजेच आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले.

दरम्यान, केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. संपूर्ण ऑपरेशन दरम्यान पंतप्रधान मोदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्याने कोणतीही चूक न करता ही मोहीम पूर्ण केली.

सैन्य, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईचे व्हिडिओ पुरावे दाखवण्यात आले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी हल्ल्यांचे तपशील दिले.

ऑपरेशन सिंदूरबद्दल अधिक-

कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आले. या अंतर्गत मुझफ्फराबादच्या सवाई नाला कॅम्पसह एकूण 9 ठिकाणी हल्ला करण्यात आला. ही सर्व ठिकाणं दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांची होती, जिथे गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम हल्ल्यांमध्ये सहभागी अतिरेकी तयार झाले होते.

हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या माहितीनुसार, ही कारवाई 1.05 ते 1.30 दरम्यान पार पडली. यामध्ये नागरी ठिकाणे टाळून केवळ दहशतवादी सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या. नागरी हानी टाळण्यात संपूर्ण यंत्रणेनं विशेष दक्षता घेतली.

Title : Hanuman Niti Used in Operation Sindoor Targeted Strike on Terror Camps

 

Join WhatsApp Group

Join Now