प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर धारदार शस्त्राने हल्ला; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

On: January 7, 2026 7:07 PM
Haji Saleen Qureshi Attack
---Advertisement---

Haji Saleen Qureshi Attack | मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. प्रचारादरम्यान उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मतदानाची तारीख जवळ येत असल्याने सर्वच पक्षांकडून रात्रंदिवस प्रचार सुरू आहे. अशा वातावरणात घडलेल्या या हिंसक घटनेमुळे निवडणूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रचार करत असतानाच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हाजी सालीन कुरेशी यांच्यावर बांद्र्यात जीवघेणा हल्ला :

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात ते प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला चढवला. हल्लेखोराने धारदार चाकूने थेट कुरेशी यांच्या पोटात वार केला. (Haji Saleen Qureshi Attack)

हल्ल्यानंतर कुरेशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली असली तरी या घटनेने समर्थकांमध्ये चिंता पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

Haji Saleen Qureshi Attack | निवडणूक प्रचारात वाढती हिंसा, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :

या घटनेमुळे मुंबईतील निवडणूक प्रचारादरम्यान वाढत्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावरही हल्ला झाला होता. प्रचाराच्या काळात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापत चालले आहे.

आचारसंहिता लागू असताना आणि लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा सुरू असताना अशा हिंसक घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई होईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

News Title : BMC Election 2026: Eknath Shinde’s Shiv Sena Candidate Stabbed During Campaign, Mumbai Shocked

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now