Hagawane Family | पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे कुटुंबाचे अनेक धक्कादायक कारनामे सातत्याने समोर येत आहेत. सुनेचा छळ, धमक्या देणे, पैशांची फसवणूक करणे, बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटीलला नाचवणे यांसारख्या अनेक प्रकरणांमुळे हे कुटुंब सध्या पोलीस कोठडीत आहे. असे असतानाही, राजेंद्र हगवणे (Rajendra hagawane) आणि त्यांच्या मुलांच्या गोष्टी समोर येत आहेत, आणि आता तर त्यांचा पुतण्या संतोष हगवणेसाठीही त्यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला धमकावल्याची माहिती उघड झाली आहे. कालच, हगवणे यांच्याकडून एका जेसीबी व्यवहारात ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. त्यानंतर, आता एका चित्रपट दिग्दर्शकानेही हगवणेंनी आपल्याला फसवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. (Vaishnavi hagawane death case)
हगवणे कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर :
हगवणे कुटुंबाचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला असून, त्यांनी चित्रपट क्षेत्रातही पैसा गुंतवल्याची माहिती मिळाली आहे. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे याने ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी हगवणे यांनी आपले लाखो रुपये थकवल्याचा आरोप केला आहे. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले होते. (Hagawane Family)
धक्कादायक म्हणजे, शशांक आणि वैष्णवीच्या लग्नात फॉर्च्युनर कारची चावी देखील अजित पवारांच्याच हस्ते हगवणे कुटुंबीयांनी स्वीकारली होती. यामुळे हगवणेंशी संबंधित आणखी एका गोष्टीचे प्रमोशन अजित पवारांच्या हस्ते झाल्याचे दिसून येत आहे, ज्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
Hagawane Family | हगवणेंनी आणखी एका व्यक्तीला धमकावल्याचे उघडकीस :
चित्रपट दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना हगवणे यांच्याकडून सातत्याने धमक्या येत होत्या. यासंदर्भात अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. याशिवाय, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडेही त्यांनी लेखी तक्रार केली होती. मात्र, कुठलीही कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. राजेंद्र हगवणे यांची ‘फोर्ड एंडेव्हर’ (Ford Endeavour) ही कार ‘खुर्ची’ चित्रपटात वापरण्यात आली आहे.
राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे (Santosh hagawane) याने चित्रपट दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना पिस्तूलही दाखवले होते. ‘माझे मामा पोलीसमध्ये मोठ्या पदावर आहेत, एटीएसमध्ये आहेत, तू माझं काहीच करू शकत नाही,’ असा दमही त्याने दिला होता. त्यामुळे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा दबाव टाकून हगवणेंनी आणखी एका व्यक्तीला धमकावल्याचे उघडकीस आले आहे.
हगवणे बंधूंनी परवान्यासाठी खोटे पत्ते दिल्याचा गुन्हा नोंद :
या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, जालिंदर सुपेकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. वैष्णवीचे मामेसासरे आणि शशांक हगवणेचे मामा असलेले जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची पदावनती करून उपमहासमादेशक, होमगार्ड या पदावर बदली करण्यात आल्याचे गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
जालिंदर सुपेकर (IAS jalindar supekar) हे वादग्रस्त हगवणे बंधूंचे मामा आहेत. त्यांच्याच सहीने सुशील आणि शशांकला २०२२ मध्ये शस्त्रपरवाना मिळाल्याचे एबीपी माझाने समोर आणले होते. याप्रकरणी, हगवणे बंधूंनी परवान्यासाठी खोटे पत्ते दिल्याचा गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.






