वैष्णवी हगवणे प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

On: May 26, 2025 6:15 PM
Vaishnavi Hagawane
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | पुण्यात वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. याप्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता या वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आत्महत्येच्या दिवसापर्यंत तिला कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

अंगावर ताजे व्रण

वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार, तिच्या अंगावर एकूण २९ व्रण आहेत, त्यातील ५ ते ६ व्रण ताजे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.

या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी सुद्धा २८ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Vaishnavi Hagawane | हगवणे कुटुंबीयांची बँक खाती गोठवली

या तपासात हगवणे कुटुंबीयांचे सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. वैष्णवीचे सोने कोणत्या कारणासाठी तारण ठेवले आणि त्यातून आलेल्या रकमेचे हगवणे कुटुंबीयांनी काय केले, याचा तपास अद्याप बाकी आहे. तसेच, फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांचा संबंध पोलिसांना तपासायचा आहे. पोलिसांना हगवणे कुटुंबीयांची एकत्र चौकशी करायची असल्यामुळे त्यांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

वैष्णवी हगवणेच्या अंगावर असलेले व्रण म्हणजेच तिला ज्या हत्याराने मारहाण केली, त्या हत्यारांचा अद्याप तपास लागलेला नाही. ती हत्यारे नेमकी कुठे ठेवली आहेत, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. यासाठीही पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास आणि सत्य समोर येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

News Title- Vaishnavi Hagawane, Post-mortem report, Domestic violence, Bank accounts frozen, Police custody

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now