तारक मेहताच्या सोढीची प्रकृती चिंताजनक, अन्नपाणीही सोडलं

On: January 11, 2025 12:39 PM
Gurucharan Health Update
---Advertisement---

Gurucharan Health Update l तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून घराघरात पोहचलेले सोढी म्हणजेच अभिनेते गुरूचरण सिंह यांच्या तब्येतीसंदर्भात एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अभिनेते गुरूचरण यांनी गेल्या 19 दिवसांपासून काहीही खाल्लं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुरूचरण सिंह यांची प्रकृती अत्यंत नाजूक :

गुरूचरण सिंह यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. कारण त्यांनी गेल्या 19 दिवसांपासून काहीही खाल्लं नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. गुरुचरण सिंह यांच्या तब्येतीची माहिती त्यांच्या एका मित्राने दिली आहे. यावेळी त्यांनी हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे देखील सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेते गुरुचरण सिंह हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते घरी परतले, मात्र त्यानंतर काही दिवसात त्यांची प्रकृती प्रचंड ढासळत गेली आहे. त्यानंतर गुरुचरण सिंह यांची मैत्रिण भक्ती सोनी हिने त्यांच्या आरोग्याबाबत देखील त्यांना सांगितले. तेव्हापासून गुरुचरण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या मित्राने सांगितले आहे.

Gurucharan Health Update l सोढीचे आई वडील काळजीत :

सुरवातीला गुरुचरण सिंह यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातून परत आल्यावर त्यांनी काम शोधण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यावेळी त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी निवृत्त व्हायचा निर्णय घेतला.

याप्रकरणी गुरुचरण सिंह यांची मैत्रीण भक्ती सोनी म्हणाल्या की, ‘आम्ही शेवटचे फोनवर बोललो तेव्हा ते मला सांगत होते की, येत्या 13 जानेवारी किंवा 14 जानेवारीपर्यंत मला समजेल की तो या पृथ्वीवर राहणार की नाही. तसेच हे त्याचे शब्द होते. मात्र त्याचे आई आणि वडील देखील त्याच्या तब्येतीबद्दल खूप काळजीत आहेत. परंतु, तो काहीच ऐकत नसल्याचं भक्ती सोनीने म्हंटल आहे.

News Title : Gurucharan Singh Health Update 

महत्वाच्या बातम्या –

महाविकास आघाडीत फुट? संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत, बंदुकीचा धाक दाखवून…

देशभर जाळं असलेल्या ‘या’ मल्टीस्टेटवर ED ची कारवाई

प्रवाशांसाठी गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन आता कळणार थेट मोबाईलवर

सरपंच हत्येपूर्वी वाल्मिक कराडने घुलेसोबत…; आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now