Gunratan Sadavarte wife | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वाद पेटला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा शेवट झाला असला, तरी त्याच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नींनी सडकून टीका केली आहे. त्यांनी जरांगेंच्या आंदोलन शैलीवर, समाजाला दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर आणि केलेल्या वक्तव्यांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘आई-बहिणींवरून बोलणं हा नीचपणा’ :
सदावर्तेंच्या पत्नींनी त्यांच्या भाषणात संताप व्यक्त करताना म्हटलं की, “माझ्या मराठा समाजाचे भाऊ आई-बहिणींवरून घाणेरडे शब्द बोलतात का? हा नीचपणाच वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभी करून, दिशाभूल करायची, महोरक्या म्हणून समोर यायचं आणि लोकांना चुकीचं दाखवायचं”.
त्यांनी पुढे इशारा देत सांगितले की, असं वर्तन समाजात फूट पाडणारं आहे. नको ती आश्वासने देऊन, लोकांना गुलाल उधळून दिशाभूल केली जात आहे, असा थेट आरोप त्यांनी जरांगेंवर केला. (Gunratan Sadavarte wife)
Gunratan Sadavarte wife | ‘आरक्षण संविधानातूनच मिळेल’ :
सदावर्तेंच्या पत्नींनी स्पष्ट केले की, आरक्षणाचा प्रश्न संविधानाशी संबंधित आहे. त्यांनी म्हटलं की, “मी माझ्या समाजासाठी संपवते, तू कोण आहेस? संविधान जे देईल तेच घेणार. त्याच्या बाहेर काही मिळू शकत नाही. दबाव आणून सरसकट ओबीसी करता येणार नाही. समाजाला चुकीचं दाखवणं बंद कर”.
त्यांनी मोदी सरकारकडून दिलेलं EWS आरक्षण हे खरं आणि कायदेशीर असल्याचंही सांगितलं. “मोदीजींनी दिलेलं आरक्षण अनेक मराठा बांधवांना उपयोगी पडलं आहे. खऱ्या अर्थाने तेच अभ्यास करण्यासारखं आहे, बाकीचं सगळं नुसतं नाटक आहे,” असा सल्लाही त्यांनी समाजाला दिला.






