मराठा आंदोलक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत आहेत, सदावर्तेंचा कोर्टात धक्कादायक दावा

On: September 1, 2025 5:38 PM
Gunaratna Sadavarte
---Advertisement---

Gunratan Sadavarte | मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण आंदोलनावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी आंदोलकांविरोधात गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की आंदोलक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत आहेत आणि पोलीस मात्र त्यांच्यासमोर असहाय्य झाले आहेत. इतकेच नव्हे तर महिला पोलीस अधिकारी आंदोलकांच्या पाया पडत असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. (Maratha Reservation Protest)

त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, आंदोलनकर्त्यांना तातडीने हटवण्याचे आदेश द्यावेत. “आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे आंदोलन सुरू आहे,” असा थेट आरोप सदावर्तेंनी केला.

आरक्षणाच्या राजकारणावर टीका :

सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी असा युक्तिवाद केला की, आंदोलनाला काही अटींसह परवानगी दिली होती. मात्र आता आंदोलकांनी संपूर्ण दक्षिण मुंबई ठप्प केली आहे. त्यांनी आरक्षणाच्या मागणीमागे थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा केला. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलनकर्त्यांना ट्रकभरून साहित्य पुरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकार या आंदोलनावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे कोर्टाने आदेश देऊन आंदोलकांना हटवावे, अशी मागणी त्यांनी सुनावणीत केली. (Maratha Reservation Protest)

Gunratan Sadavarte | कोर्टाचे आदेश :

मराठा आंदोलकांसाठी आझाद मैदान जागा निश्चित करण्यात आली होती. तरीही ते अनेक ठिकाणी गर्दी करत असल्याचे आढळून आले. यावरून न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले की, बाहेरून येणाऱ्या लोकांना थांबवावे आणि दक्षिण मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटन परिसरातून आंदोलकांना हटवावे.

दरम्यान, राज्य सरकारने दावा केला की, आंदोलक नेते मनोज जरांगे यांना केवळ एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली होती. मात्र आंदोलकांच्या वकिलांनी सरकारने नंतरही परवानगी दिल्याचे सांगितले. या प्रकरणी आता मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

News Title: Gunratan Sadavarte Accuses Maratha Protesters of Carrying Liquor Bottles; Demands Action in Mumbai High Court

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now